विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार केला. ८ महिन्यांनंतर उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

  या निवडणुका लक्षात घेऊनच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet re shaffle) करण्यात आला आहे. उप्रमध्ये भाजपला (BJP) अधिक बळकट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन मंत्रिमंडळात उत्तरप्रदेशाला जास्त प्रतिनिधित्व देणे आवश्यक होते. नवीन ३६ मंत्र्यांमध्ये ७ मंत्री उत्तरप्रदेशचे आहेत. आता केंद्रीय मंत्रिमंडळात उत्तरप्रदेशचे एकूण १६ मंत्री झालेले आहेत. इ. स. २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या असून उत्तरप्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत.

  उत्तरप्रदेशच पंतप्रधानांच्या निवडीमध्ये निर्णायक भूमिका बजावित आलेला आहे. आतापर्यंत देशाचे जे पंतप्रधान झालेले आहेत, त्यातील बहुतांश पंतप्रधान हे उत्तरप्रदेशचेच आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा उत्तरप्रदेशातील वाराणसींचे प्रतिनिधित्व करतात. मोरारजी देसाई, पी. व्ही. नरसिंहराव, एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजराळ आणि डॉ. मनमोहनसिंग हेच इतर राज्याचे होते.

  पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाहूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग, अटलबिहारी वाजपेयी हे सर्व पंतप्रधान उत्तरप्रदेशचेच होते. नुकताच जो केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला त्यामध्ये उत्तरप्रदेशातील भाजपचा सहकारी पक्ष ‘अपना दल’च्या प्रमुख अनुप्रिया पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे.

  पंतप्रधान मोदी यांचे गृहराज्य गुजरातमधून मनसुख मंडाविया आणि पुरुषोत्तम रूपाला यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. नवीन राज्यमंत्री देवूसिंह चौहान हेसुद्धा गुजरातमधील खेडा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. इ. स. २०२२ मध्ये गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सुरतचे खासदार दर्शन विक्रम जरदोश यांची पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्रिपदी वर्णी लावण्यात आलेली आहे.

  पंजाबमध्येसुद्धा इ.स. २०२२ विधानसभेच्या निवडणुका होणार आहे, परंतु या मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबमधून कोणाचीही वर्णी मंत्रिमंडळात लावण्यात आलेली नाही, परंतु शीख समाजाचे हरदीपसिंह पुरी यांना राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली. तेलंगणामधील किशन रेड्डी यांनाही राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेटमंत्री करण्यात आले आहे. तेलंगणामध्ये आगामी विधानसभा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा मोदी-शाह यांचा मानस आहे.

  कर्नाटकमध्ये भाजप आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत आहे, म्हणूनच या मंत्रिमंडळ विस्तारात शोभा करांदलजे, राजीव चंद्रशेखर, नारायण स्वामी आणि भगवंत खुबा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या विस्तारामध्ये मागासवर्गीयातून पशुपती पारस यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्रिपदी वणी लागलेली आहे.

  Laying the foundation for cabinet reshaffle for victory in Assembly elections