कौशल्याच्या अभावामुळे उच्च शिक्षितांना कमी वेतन

  • टिअर-२ आणि टिअर-३ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळत नाहीत. नवीन पदवीधर युवकांची मुख्या समस्या त्यांच्यामध्ये कौशल्याचा अभाव असणे ही आहे. या पदवीधरांमद्ये कौशल्याचा अभाव आणि अनुभवाची कमतरता असल्यामुळे त्यांना कोणत्याही उद्योगात नोकरी मिळत नाही.

उच्च शिक्षित असूनही कौशल्य नसल्यामुळे कित्येक तरुणांना कमी वेतनामध्ये नोकरी करावी लागते. एडटेक स्टार्टअप ‘स्केलर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहीती समोर आली आहे. अनेक युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार वेतन मिळत नाही. शिक्षण असूनही काम करण्याचे कौशल्य नसल्यामुळे त्यांच्यावर कमी वेतनामध्ये नोकरी करण्याची वेळ आली आहे. सुमारे २.५ लाख विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करतात, परंतु त्यांना केवळ ३.५ लाख रुपये वार्षिक वेतन मिळत असते. दरवर्षी १५ लाख विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी मिळवितात. त्यातील पॅकेज ४० हजार पदवीधरांनाच ८ ते १० लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळत असते. एकूण पदवीधरांपैकी ही संख्या केवळ ३ टक्के आहे. उच्च पॅकेज मिळविणारे तरुण अभिंयते टिअर-१ महाविद्यालयातून आलेले आसतात. टिअर-२ आणि टिअर-३ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळत नाहीत. नवीन पदवीधर युवकांची मुख्या समस्या त्यांच्यामध्ये कौशल्याचा अभाव असणे ही आहे. या पदवीधरांमद्ये कौशल्याचा अभाव आणि अनुभवाची कमतरता असल्यामुळे त्यांना कोणत्याही उद्योगात नोकरी मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती अशी आहे की, सुमारे १२.५ टक्के इंजिनिअर्सना नॉन टेक्निकल नोकरी करावी लागते. या नोकरीमध्ये त्यांच्या शिक्षणाचा काहीही संबंध नसतो. लहान शहरातील महाविद्यालयातून ज्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली असते त्या विद्यार्थ्यांची तर अत्यंत हलाकीची परिस्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशेची भावना निर्माण होते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या अभ्यासक्रमात योग्य बदल करणे आवश्यक आहे. व्यावहारिक किंवा प्रॅक्टिकल शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना तयार करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम निश्चित करताना उद्योग क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळीचा सल्ला घेतला पाहिजे. आता असे म्हटल्या जात आहे की, कोरोनाच्या संकटानंतर रोजगारांच्या संधीमध्ये वाढ होईल. कित्येक विद्यार्थी इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एमबीए चे शिक्षण घेत आहे. भारतीय इंजिनिअर्स आता त्यांचे कौशल्य आणखी वृद्धिंगत करीत आहेत. येणाऱ्या काळात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मोबाईल डेव्हलपमेंट, व्यापार तंत्रज्ञान ये क्षेत्रातील कौशल्य महत्त्वाचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत जे विद्यार्थी आपले कौशल्य अधिक वृद्धिंगत करेल त्यांच्यासाठी आणखी नव्या संधी निर्माण होईल.