स्थलांतरित मजुरांविना महाराष्ट्र लाचार

उत्तर प्रदेश आणि बिहारचे मजूर पुन्हा महाराष्ट्रात परत येऊ लागले आहेत. लॉकडाऊनमुळे हे मजूर आपापल्या राज्यातील त्यांच्या गावाला परत गेले होते. उद्योग, व्यापार, गृहनिर्माण आणि वाहतूक क्षेत्रात हे

 उत्तर प्रदेश आणि बिहारचे मजूर पुन्हा महाराष्ट्रात परत येऊ लागले आहेत. लॉकडाऊनमुळे हे मजूर आपापल्या राज्यातील त्यांच्या गावाला परत गेले होते. उद्योग, व्यापार, गृहनिर्माण आणि वाहतूक क्षेत्रात हे मजूर कार्यरत होते. मजूर नसल्यामुळे उद्योग ठप्प पडले. हे मजूर येथे कमी खर्चामध्ये स्वत:ची गुजरान कतात व त्यांच्या मिळकतीतील मोठी रक्कम गावाला असलेल्या कुटूंबीयांसाठी पाठवितात. मजूर त्यांच्या राज्यात परत गेल्यामुळे आता स्थानिक मजुरांना काम मिळेल, असे बोलल्या जात होते, परंतु तसे काहीही झाले नाही आणि यापुढे होणारही नाही. महाराष्ट्रातील मजूर मेहनती कामे कधीच करीत नाही. राज्यातील मजुरांनी ती कामे केली असती तर परप्रांतातील मजुरांची आवश्यकताच भासली नसती. काही वर्षांपूर्वी मनसेनने परप्रांतीय मजुरांना मार-पीट करुन त्यांना राज्यातून हाकलून देण्याची मोहीम सुरु केली होती. परंतु त्यानंतर मात्र असे दिसून आले की, जड उद्योग, वाहतूक, ऑटो-टॅक्सी, गृहनिर्माण इत्यादी क्षेत्रामध्ये मजुरांची आवश्यकता असते कारण राज्यातील मजूर या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी उत्सुक नाहीत. शेतीच्या भरवशावर हंगाम संपल्यानंतर कोणतीही कामे नसतात, तेव्हा बेरोजगार राहून उपाशी राहण्यापेक्षा हे मजूर दिल्ली, मुंबई, बंगलोर, सूरत इत्यादी शहरात कामे करण्यासाठी येतात. तेथे मिळेल ती कामे करुन आपली उपजिविका करतात. या क्षेत्राच्या विकासात बाहेरच्या राज्यातील मजुरांचा मोठा वाटा आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या मजुरांवर बेरोजगारीची वेळ आली, तेव्हा येथे राहण्यापेक्षा त्यांनी आपापल्या गावाचा रस्ता धरला. परंतु आता लॉकडाऊन शिथिल होताच या मजुरांचा आत्मविश्वास वाढला आणि जवळजवळ २० हजार मजूर विशेष गाड्यांनी पुन्हा मुंबई शहरात परतले आहेत. परिस्थिती जशी-जशी सामान्य होईल त्या प्रमाणात मजूर पुन्हा शहराकडे परत येईल. ही एक चांगली बाब आहे की, महाराष्ट्र सरकारने या परप्रांतीय मजुरांची नोंदणी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे हे मजूर आता असुरक्षित राहणार नाही. त्यांना नियमानुसार उपलब्ध करुन दिल्या जाईल. राज्याच्या एकूणच अर्थकारणात या मजूरांच्या योगदानाची उपेक्षा करता येणार नाही.