बिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब

ज्या मगध साम्राज्यात चंद्रगुप्त मौर्य सारख्या सम्राटाने ग्रीकांना चारीमुंड्या चीत केले होते. जेथे सम्राट अशोक यांच्यासारखे महान सम्राट होऊन गेले. जथे नालंदासारखे जगातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र होते, त्या बिहार राज्याची इतकी वाईट परिस्थिती का झाली? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लोकनायक जयप्रकाश नारायण, रामधारीसिंह दिनकर, फणीश्वरनाथ रेणू यांच्यासारख्या महान नेत्यांच्या या भूमीची इतकी दुरावस्था का झालेली आहे?

  देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षेझाली, परंतु अजूनही बिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या गरिबीचे जीवन जगत आहे, ही अत्यंत शरमेची बाब आहे. बिहारच्या या दुर्दशेला सरकार, प्रशासन आणि पुढारी जबाबदार आहेत का? देशातील अनेक राज्यांचा विकास झालेला आहे, परंतु बिहार मात्र अजूनही मागासलेलाच आहे. हे असे का झाले असावे?
  ज्या मगध साम्राज्यात चंद्रगुप्त मौर्य सारख्या सम्राटाने ग्रीकांना चारीमुंड्या चीत केले होते. जेथे सम्राट अशोक यांच्यासारखे महान सम्राट होऊन गेले. जथे नालंदासारखे जगातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र होते, त्या बिहार राज्याची इतकी वाईट परिस्थिती का झाली? भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लोकनायक जयप्रकाश नारायण, रामधारीसिंह दिनकर, फणीश्वरनाथ रेणू यांच्यासारख्या महान नेत्यांच्या या भूमीची इतकी दुरावस्था का झालेली आहे?
  एसडिजीच्या इ.स. 2020-21 च्या अहवालात बिहार देशातील सर्वात मागासलेले राज्य आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे. सरकारनेही हे मान्य केलेले आहे की, बिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या गरीब आहे. तेथील 33.74 टक्के जनता दारिद्र्यरेषेच्या खाली जीवन जगण्यास मजबूर आहे. 52.5 टक्के जनता गरिबीमुळे प्रभावित झालेली आहे. कुपोषणामुळे बिहारमधील 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या 42 टक्के मुलांचा विकास झालेला नाही.
  हा आकडा देशातील इतर राज्यांपेका जास्त आहे. शिक्षणाचीही बिहारमध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातही बिहार खपू मागासलले आहे. तेथे गरिबी आणि मागासलेपण का आहे, याचा विचार केला तर बिहारमध्ये वारंवार नद्यांना येणारे महापूर हे कारण सांगण्यात येते.
  पूरग्रस्तांना जी मदतसामग्री येते त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम आणि सामग्री तेथील नेतेच हडप करतात. इतक्या वर्षानंतरही तेथे पूरनियंत्रणाच्या कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. उद्योगधंदे नसल्यामुळे बिहारमध्ये बेकारी वाढलेली आहे. बिहारमध्ये गुंडगिरी, अपहरण, चोऱ्या आणि दरोडाच्या घटना मोठ्या संख्येने होतात. गुन्हेगारांना तेथे राजकीय संरक्षण मिळत असते!
  बिहारमध्ये प्रतिभावंतांची कमतरता नाही. तेथील युवकांना सत्ता हवी असते. ज्यांच्याजवळ पैसा किंवा लोकप्रियतेचा वारसा आहे, असे युवक राजकारणात जातात. तेथील कितीतरी युवक आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत. ते देशातील अन्य राज्यांना त्यांच्या सेवा पुरवितात. जागतिक किर्तीचे महान गणितज्ज्ञ वशिष्ठ नारायणसिंह व सुपर-30 चे जनक प्रो. आनदं कुमार हे सुध्दा बिहारचेच आहेत. इतकेसर्व असनूही बिहार मागासलेले राहणे हे अत्यंत दु:खद आणि आश्चर्यकारक आहे.