डॉक्टर नव्हे नरपिशाच्च ५० पेक्षा जास्त लोकांची हत्या करणारा राक्षस

  • या सैतानाने पोलिसांसमोर कबूल केले की, ५० पेक्षा जास्त हत्या केल्यानंतर आपण हत्या केलेल्यांची संख्या मोजणेच बंद केले आहे. पोलीसांचे मात्र असे म्हणणे आहे की, या डॉक्टरने १०० पेक्षाही जास्त लोकांना ठार मारले आहे. या डॉक्टरने इ.स. १९९५ मध्ये अलिगडच्या छारा गावात बोगस गॅस एजंसी सुरु केली. त्यानंतर त्याने गुन्हेगारी जगात प्रवेश केला. डॉक्टर घरेलू गॅस सिलिंडरचे ट्रक आडवायचा. ड्रायव्हरला ट्रकखाली ओढून त्याला ठार मारायचा.

डॉक्टरला लोक परमेश्वर समजतात. डॉक्टर मृत्यूच्या दाढेतून मानवाचा बचाव करीत असतो, परंतु उत्तर प्रदेशच्या अलिगड जिल्ह्यातील पुरेनी गावातील बीएएमएस पदवीधारक डॉक्टर देवेंद्र शर्मा सैतानापेक्षाही भयंकर निघाला. या डॉक्टरने दिल्ली आणि इतर राज्यातील ५० पेक्षाही जास्त ट्रक आणि टॅक्सी ड्रायव्हरची हत्या केली. या सैतानाने पोलिसांसमोर कबूल केले की, ५० पेक्षा जास्त हत्या केल्यानंतर आपण हत्या केलेल्यांची संख्या मोजणेच बंद केले आहे. पोलीसांचे मात्र असे म्हणणे आहे की, या डॉक्टरने १०० पेक्षाही जास्त लोकांना ठार मारले आहे. या डॉक्टरने इ.स. १९९५ मध्ये अलिगडच्या छारा गावात बोगस गॅस एजंसी सुरु केली. त्यानंतर त्याने गुन्हेगारी जगात प्रवेश केला. डॉक्टर घरेलू गॅस सिलिंडरचे ट्रक आडवायचा. ड्रायव्हरला ट्रकखाली ओढून त्याला ठार मारायचा. त्यानंतर हा डॉक्टर आणि त्याचे सहकारी त्याच्या बोगस गॅस एजन्सीमार्फत गॅस विकायचा. हा डॉक्टर अपहरण आणि खूनाच्या प्रकरणामध्ये दोषी आढळलेला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थानमध्ये या डॉक्टरविरुद्ध अनेक प्रकरणे न्यायालयात सुरु आहेत. हत्येच्या एका प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आले आहे. पॅरोलवर तुरुंगातून तो बाहेर यायचाय तुरुंगातून बाहेर आल्यावर हा डॉक्टर दिल्लीनजीक असलेल्या बपरोला येथे राहत होता. पॅरोलचा कालावधी संपल्यानंतरही तो पुन्हा तुरुंगात न जाता दुसरीकडे राहत होता. पोलीसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला पकडून पुन्हा न्यायालयात हजर केले. अशा गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. आपल्या न्यायव्यवस्थेत गुन्हेगारांनाही पॅरोलवर मुक्त करण्यात येते आणि पॅरोलवर असतानाही तो बाहेर आणखी गुन्हे करीत असतो. हा गुन्हेगार डॉक्टर इ.स. १९९४ मध्ये किडनी विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीमध्ये सहभागी झाला होता. इ.स. २००४ मध्ये गुडगाव येथे जेव्हा आंतरराज्यीय किडनी रॅकेट पकडण्यात आले होते, तेव्हा या डॉक्टरसोबत अनेक डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी हा डॉक्टर अनेक राज्यामध्ये तुरुंगातही होता. पॅरोलचा कालावधी संपल्यानंतर या डॉक्टरने एका विधवेशी लग्न केले आणि प्रॉपर्टीचा व्यवसाय करु लागला. अशी खुनी व्यक्तीचे बाहेर राहणे म्हणजे समाजाला अत्यंत धोकादायक आहे. अशा गुन्हेगारांना पॅरोलवर सोडूच नये. खून करणाऱ्या अपराध्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाते. परंतु ५० पेक्षा जास्त हत्या करणाऱ्या या डॉक्टरला जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. याला मृत्यूदंडाची शिक्षाच ठोठावायला पाहिजे.