आता विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे; सुरक्षा धोक्यात, ड्रोन हल्ल्यातून कसे सावरता येईल?

सुरक्षा दलात जे तंत्रज्ञान वापरतात, तेच तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती जाऊन विध्वंसक होते. लष्कर आणि हिजबुलच्या दहशतवाद्यांना पाक गुप्तचर संस्था आयएसआयची मदत तसेच प्रोत्साहनही मिळते. एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरमध्ये निवडणुका करणे आणि त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासारख्या मुद्द्यांवर काश्मिरी नेत्यांशी चर्चा केली तर दुसरीकडे शांतीत विघ्न टाकण्यासाठी दहशतवाद्यांनी ड्रोनद्वारे हल्ला केला.

    जम्मू विमानतळ परिसरात एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्याची तपासणी एनआयए करीत आहे. ३ दिवसात ३ ठिकाणी ड्रोन आढळून आले. जम्मूच्या सुंजवान मिलिट्री स्टेशनजवळ कुंजवान आणि कालूचक सेना केंद्राच्या भागात ड्रोन फिरताना दिसून आले. हे लक्षात घेता भारताने ड्रोन डिफेन्स सिस्टिम तयार केली आहे. या ड्रोन डिफेन्स सिस्टिमचे नाव ‘इंद्रजाल’ असे आहे व यास ग्रीन रोबोटिक्सकडून तयार करण्यात आले आहे. ही देशाची पहिली स्वदेशी ड्रोन संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली १००० ते २००० चौरस किलोमीटरपर्यंत असलेल्या धोक्याला अपयशी करते.

    ग्रीन रोबोटिक्सने ८ वर्षे अथक कष्ट करून ही प्रणाली तयार केली आहे. ग्रीन रोबोटिक्सचे सल्लागार बोर्डात सहभागी निवृत्त सुरक्षा संशोधक, उपसेना प्रमुख, बीईएलचे संचालक व वायुसेनेचे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी यास तयार करण्यात अतिशय मदत केली आहे. चीनने पाकिस्तानला घातक क्षमता असणारे ड्रोन उपलब्ध करून दिले असतील, याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. हा असा छुपा हल्ला आहे ज्यामध्ये हल्ल्याचा मास्टर मांड ओळखला जाऊ शकला नाही.

    सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, म्हणून आता दहशतवाद्यांनी स्फोटक ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मध्य पूर्वेतील देशांमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी कासिम सोलेमानी हे ड्रोन हल्ल्यामुळे ठार झाले होते.

    सीरिया युद्धात तुर्कीने ड्रोनचा भरपूर उपयोग केला होता. डीआरडीओने ड्रोनला निष्क्रिय करण्याची यंत्रणा विकसित केली आहे. यासाठी जामर लावण्यात येतो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन उत्सवादरम्यान अशा यंत्रणेमुळे कोणताही ड्रोन दिल्लीत प्रवेश करू शकत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये ड्रोनची हालचाल लक्षात घेता, सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहावे लागेल. पाकिस्तानचे कट्टर नेते बनून भारताविरोधी कट रचण्यात गुंतलेल्या अशा घटकांवर बारीक नजर ठेवावी लागेल.

    Now is the time to think Security threat show to recover from drone attacks