\mathura krishna janmbhumi

सरकारला आंदोलन केल्याशिवाय जाग येणारच नाही. यासाठी संघर्ष करावाच लागेल. ज्यांनी कोणी ही याचिका दाखल केलेली आहे, त्यांनी चांगले काम केलेले आहे. आता कृष्ण जन्मभूमीला मुक्त करण्यासाठी न्यायालयाचे द्वार ठोठवावे लागणार की, मोठे आंदोलन करावे लागेल याबाबतच निर्णय घ्यावा लागणार आहे. बजरंग दल आणि विहिंपला मोदी सरकारकडून जरा जास्तच अपेक्षा आहेत.

केंद्रातील भाजपा सरकारपुढील अडचणी काही कमी होताना दिसत नाही. सरकार एक समस्या सोडवत नाही तर दुसरी येऊन तयारच असते. श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न सुटला आता कृष्ण जम्मभूमीचा (Krishna’s birthplace) विवाद (issue)  पुढे येत आहे. खरं म्हणजे भाजप आणि रा.स्व.संघ त्यांच्याच अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे  (BJP activists) त्रस्त आहेत. देशासमोर कोरोना महामारी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे शेतमालाच्या भावासाठी आंदोलन इत्यादी अनेक प्रश्न असताना बजरंग दलाचे नेते विनय कटियार यांनी कृष्ण ज्मभूमीच्या गर्भगृहाबाबत दाखल केलेल्या याचिकेवस प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सरकारला आंदोलन केल्याशिवाय जाग येणारच नाही. यासाठी संघर्ष करावाच लागेल. ज्यांनी कोणी ही याचिका दाखल केलेली आहे, त्यांनी चांगले काम केलेले आहे. आता कृष्ण जन्मभूमीला मुक्त करण्यासाठी न्यायालयाचे द्वार ठोठवावे लागणार की, मोठे आंदोलन करावे लागेल याबाबतच निर्णय घ्यावा लागणार आहे. बजरंग दल आणि विहिंपला मोदी सरकारकडून जरा जास्तच अपेक्षा आहेत. परंतु सरकार संविधान आणि कायद्याच्या चाकोरीतच कार्य करीत असते. रामजन्मभूमीचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुटला. न्यायालयाच्या निर्णयामुळे राममंदिर बांधण्याचा प्रश्न एकदा निकाली लागला. यानंतर मथुरा आणि काशीच्या प्रश्नावर शांत राहण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु भाजपचे माजी राज्यसभा सदस्य विनय कटियार यांनी कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा उचलून धरला आहे. राम जन्मभूमीच्या मुद्यावार संपूर्ण देशात किती भडक प्रतिक्रिया उमटल्या होत्या हे सर्वांना माहीतच आहे. काही राजकीय नेत्यांना सहिष्णुता आणि समन्वय यांच्याशी काहीही सोयरसुतक नसते ते धार्मिक प्रश्नावर नवे वाद निर्माण करण्याच्याच प्रयत्नात असतात. यामुळे ते पक्षाच्या नेतृत्वापुढे नव्या समस्या निर्माण करीत असतात. सरकारला सर्व धर्मियांना सोबत घेतलेले आहेत. चीन तलाकला सरकारने बेकायदेशीर जाहीर केले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० व ३५ ए हटविण्याचा निर्णय घेतला. सरकारचे हे सर्व निर्णय क्रांतिकारी होते. आता सरकारपुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न, समस्या आहेत. परंतु भावनात्मक मुद्यावर आंदोलन करणाऱ्यांना मात्र याबद्दल मुळीच काळजी नाही. ते नेहमीच त्यांच्या वेगळ्याच अजेंड्यावर चालत असतात.