Outbreak of unknown disease in Andhra Pradesh

जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी या आजाराचे रोगी आढळून आले आहेत. या रोग्यांचे एकमेकांशी संबंधसुद्धा आले नव्हते. शिवाय हे लोक एकत्रितपणे कोणत्याही मोठ्या समारंभात 'सहभागीही झाले नव्हते, असे असतानाही या सर्व रोग्यांमध्ये मात्र सारखीच लक्षणे दिसून आली आहेत. सर्व रोग्यांचे सिटी स्कॅन आणि एक्स-रे रिपोर्टही नॉर्मल आहेत.

वैद्यकीयशास्त्राने अनेक आजारांवर औषधी शोधून काढलेल्या आहेत. त्या औषधीने कित्येक रोगीही दुरुस्त झालेले आहेत, परंतु अजूनही कितीतरी रहस्यमय आजार मानवासमोर आव्हान बनून उभे आहेत. रोगांचे निदान करणे आणि त्यावर औषधोपचार करण्याचे काम डॉक्टर्स करतात, परंतु असे काही नवीन रोग येतात की, यापूर्वी अशाप्रकारचे आजार अस्तित्वातच नव्हते. आंध्रप्रदेशात कोविड-१९ या आजाराने कहरच केलेला आहे. देशातील तिस-या क्रमांकाचे ते कोविडग्रस्त राज्य आहे. या राज्यामध्ये ८.७१ लोक कोविडचे रोगी आहेत. यापैकी ७ हजारांपेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोविड-१९ ही महामारी सुरू असतानाच आंध्रप्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरू येथे आणखी एक अज्ञात आजार पसरलेला आहे. डोके दुखणे, चक्कर येणे आणि फिट येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. या नव्या रहस्यमय आजाराने २०० पेक्षाही जास्त ‘लोक पीडित झालेले आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी या आजाराचे रोगी आढळून आले आहेत. या रोग्यांचे एकमेकांशी संबंधसुद्धा आले नव्हते. शिवाय हे लोक एकत्रितपणे कोणत्याही मोठ्या समारंभात सहभागीही झाले नव्हते, असे असतानाही या सर्व रोग्यांमध्ये मात्र सारखीच लक्षणे दिसून आली आहेत. सर्व रोग्यांचे सिटी स्कॅन आणि एक्स-रे रिपोर्टही नॉर्मल आहेत.

वैद्यकशास्त्र जस-जसे विकसित होत आहे, त्याचप्रमाणावर नवीन आजारही विकसित होताना दिसू लागले आहेत. वैद्यकशास्त्रासमोर नवीन आव्हानं उभे राहत आहेत. इतिहास जर पाहिला तर न्यूमोनियानेसुद्धा कितीतरी लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. इ.स. १९४८ पर्यंत देशात अँटीबायोटिक नव्हती. परिणामी प्लेग, कॉलरा, मलेरियामुळे कितीतरी लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी टीबीवरही इलाज उपलब्ध नव्हता. देशाची लोकसंख्या ४० कोटी होती, तेव्हा लोकांचे सरासरी वयोमान २७ वर्षे होते. आता मात्र ही सरासरी ५८ वर्षे झालेली आहे. देशातील २ कोटी लोकांचे वय ७५ वर्षांपेक्षाही जास्त आहे. आता वेगवेगळे व्हॅक्‍सीन उपलब्ध असल्यामुळे वयोमान वाढलेले आहेत. देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन झालेले आहे. ज्याप्रमाणे इ.स. १८९८ आणि इ.स. १९१४ मध्ये प्लेगची बिमारी आली होती, त्याचप्रमाणे आता कोविड-१९ ने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. सर्वांना आता कोरोना व्हॅक्‍सीनची प्रतीक्षा असतानाच आंध्रप्रदेशात पुन्हा एका नवीन आजाराने वैद्यकशास्त्रासमोर नवे आव्हान उभे केले आहे.