सुरक्षेत कपात केल्यामुळे विरोधकांमध्ये नाराजी

नेत्यांची सुरक्षा सध्या राजकीय चर्चेचा विषय झालेला आहे. सुरक्षा व्यवस्थेवरच नेत्यांचे श्रेष्ठत्व ठरविण्याची मानसिकता रूढ झालेली आहे. ज्या नेत्याला जास्त सुरक्षा, तो मोठा नेता, असे समजण्यात येत आहे. नेत्यालाही सुरक्षेचा दर्जा कमी झाला तर वाईट वाटते. नेत्यांच्या सुरक्षकडे कानाडोळा केला जात आहे म्हणून वाईट नाही. तर सुरक्षा कमी करून आपले महत्त्व कमी समजण्यात येते, असे या नेत्यांना वाटत असते.

कोणत्या नेत्याला किती धोका आहे. याची शहानिशा करूनच त्या नेत्यांना सुरक्षा पुरविली जाते. सुरक्षेचा दर्जाही त्यावरच ठरत असते. विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली तर त्या नेत्याला असे वाटते की, सरकार आपले महत्व कमी करीत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेश माजी राज्यपाल राम नाईक व मनसेप्रमुख राज ठाकरे याच्या सुरक्षा व्यवस्थेत सरकारने कपात केली आहे. भाजपाने सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे. दुसरीकडे सुरक्षेवरूनच एक नवीनच पायंडा पडला आहे. राकाँ प्रमुख शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून सांगितले की, सरकारने मला दिलेली सुरक्षा कमी करण्यात यावी. मला सुरक्षेची आवश्यकता नाही तेव्हा उगीच मला सुरक्षा पुरविण्याची आवश्यकता नाही.

नेत्यांना पूर्वीपासूनच कमी अधिक सुरक्षा पुरविण्यात येत होती. परंतु जेव्हापासून अतिरेक्यांचा धोका वाढू लागला. तेव्हापासून तर नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ‘एक काळ असा होता की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू खुल्या जीपमध्ये उभे राहन लोकांचे अभिवादन स्वीकारत होते. नेते आले म्हणजे गर्दी होणे स्वाभाविकच आहे. सुरक्षा व्यवस्थकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झालेली आहे. महात्मा गांधी यांच्या सुरक्षेसाठी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी साध्या कपड्यातील पोलिसांना तैनात केले होते, परंतु गांधीजींनी त्यावरही आक्षेप घेऊन ती सुरक्षा व्यवस्था काढून टाकली होती.

सुरक्षेचा अभाव आणि लोकांची तपासणी न केल्यामुळेच प्रार्थना सभेत महात्मा गांधींची हत्या झाली. ऑपरेशन ब्लू स्टार नंतर इंदिरा गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतानाही त्यांनी सुरक्षेसाठी नकार दिल्यामुळेच इंदिरा गांधींची त्यांच्याच अंगरक्षकाने हत्या केली. सध्या सर्व मंत्र्यांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. प्रत्येक मंत्र्यांकडे त्यांचे अंगरक्षक आहे. परंतु कोणत्या मंत्र्याला किती धोका आहे. हे पुरविण्यात आला आहे, अ न्यांच्या मप्परधेच्या टर्जावरूनच गगखिपयात रोम.