corona vaccine update serum institute of india has now prepared 60 million vaccine dose

ऑक्सफोर्डचे व्हॅक्‍सीन ७०.४ टकके प्रभावी ठरले आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत या व्हॅक्सीनला भारतात मंजुरी दिली जाणार आहे. हे व्हॅक्‍सीन कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयोगाचे ठरणार आहे.

भारतात कोरोना (corona) संक्रमित लोकांची संख्या ९२ लाखांच्यावर गेलेली आहे तर १ लाख ३५ हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. दिल्ली, राजस्थान, हरयाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, गोवा कोरोनाचे नवे ‘हॉट स्पॉट’ (Corona hotspot) आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि आसाम येथील राज्य सरकारांना कोरोना महामारीची परिस्थिती हाताळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, याची माहिती २ दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देश दिले आहे. या महामारीच्या काळात एक आनंदाची बातमी आलेली आहे की, पुढील वर्षी संपूर्ण देशातील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. ऑक्सफोर्डचे व्हॅक्‍सीन (Oxford vaccine) ७०.४ टक्के प्रभावी ठरले आहे.

यावर्षीच्या अखेरपर्यंत या व्हॅक्‍सीनला भारतात मंजुरी दिली जाणार आहे. हे व्हॅक्सीन कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयोगाचे ठरणार आहे. सरकारी रुग्णालयात या व्हॅक्सीनचा एक डोस २२० ते २३० रुपयांपर्यंत मिळेल तर खासगी रुग्णालयात हा डोज ५००रु, ६०० रुपये किमतीचा राहणार आहे. सुरुवातीला डॉक्टर्स, सफाई कामगार इत्यादींना ही लस दिली जाणार आहे. सीरम इन्स्टट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितले की, एस्ट्रोजनच्या ऑक्सफोर्ड व्हॅक्सीन साठी आपत्कालीन परवाना दिला जाणार आहे. हे व्हॅक्‍सीन ८ डिग्री सेल्सिअस तापमानावर (फ्रीजचे तापमान) ठेवता येऊ शकेल.

यामुळे हे व्हॅक्‍सीन भारतासारख्या देशात कुठेही घेऊन जाता येईल. इतर २ व्हॅक्‍सीनला मात्र शून्य डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवावे लागणार असल्यामुळे ते देशात इतरत्र नेता येणार नाही. एस्ट्रोजनच्या ऑक्सफोर्ड व्हॅक्‍सीनचे रोग्याला दोन डोज द्यावे लागणार आहे. हे व्हॅक्‍सीन फायजर आणि मॉडर्न या कंपन्यांच्या व्हॅकसीनपेक्षा स्वस्त आहे. फायजरच्या व्हॅक्‍सीनची किंमत १५०० रुपये तर मॉडर्नचे व्हॅकसीन २७७५ रुपयांचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, या व्हॅक्‍सीनचे अंतिम परीक्षण येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येईल. या व्हॅक्‍सीन परीक्षणामध्ये २६ हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. ही लस वृद्ध आणि बालकांसाठी किती प्रभावी ठरेल, हे आता बघायचे आहे.