पाकिस्तानची नवीन खेळी ; आता तयार करताहेत ‘पार्ट टाईम’ दहशतवादी

पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी जेव्हा काश्मीर मुद्दयावरील चर्चेमध्ये पाकिस्तानळाही सहभागी करून घेतले पाहिजे असे वक्तव्य केले, तेव्हापासूनच ड्रोन हल्ले सुरू झाले. हे ड्रोन कोणी पुरविले, कुठून आले आणि कोण या ड्रोनचे संचालन करीत आहे याबाबतीत अजूनपर्यंत तरी शोध लागलेला नाही. अतिरेकी जर हल्ला करताना आढळले तर त्यांना पकडता येईल किंवा त्यांना ठार करता येईल, परंतु स्फोटक सामग्रीसह ड्रोन कुणी पाठविले याची माहितीही मिळत नाही. पाकिस्तान काश्मिरमध्ये राहणार्‍या पार्ट टाईम अतिरेक्यांची मदत घेत आहेत.

    काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाला आता अशा अतिरेक्यांच्या आव्हानाचा मुकाबला करावा लागत आहे की, हे अतिरेकी असल्याचे ओळखणेही कठीण झालेले आहे. पाकिस्तानने आता नवीच खेळी केलेली आहे. पाकने आता नवीन प्रकारचे अतिरेकी तयार केलेले आहेत. हे अतिरेकी अचानक येऊन हल्ला करतात आणि हल्ल्यानंतर एखाद्या वस्तीमधील घरात आश्रय घेत असतात. त्यानंतर ते अगदी शांततेने पुढील आदेशाची वाट पाहात असतात. दुसरा आदेश मिळाला की, त्यानुसार पुन्हा हल्ले सुरू करतात. या अतिरेक्यांना पकडल्यानंतर ते कोणाच्या आदेशानुसार हल्ले करतात आणि त्यांचा प्रमुख कोण आहेत, याचाही पत्ता लागत नाही. हे सर्व ‘पार्ट टाईम’ अतिरेकी आहेत आणि ते अगदी सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगत असतात, त्यामुळे त्यांच्यावर अतिरेकी असल्याची कोणी शंकाही घेत नाही. पाकिस्तान स्थानिक युवकांना भडकवून त्यांना ‘पार्ट टाईम’ अतिरेकी बनवित आहेत. सध्या काश्मिरात ड्रोन हल्ले होत आहेत. यासाठी पाकिस्तानने स्थानिक नागरिकांचाच वापर केलेला आहे. अतिरेकी सर्वसामान्य नागरिकांसारखेच असतात. त्यांना पाहून कोणीही म्हणू शकणार नाही की, ते अतिरेकी संघटनांचे प्यादे आहेत. ते अगदी निष्क्रिय बनून राहतात आणि हल्ले करण्याच्या आदेशाची वाट पाहात असतात. आदेश मिळताच हल्ला करतात. हल्ला केल्यानंतर कोणतेही पुरावे न सोडता सामान्य लोकांमध्ये मिसळून जातात. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी जेव्हा काश्मीर मुद्दयावरील चर्चेमध्ये पाकिस्तानळाही सहभागी करून घेतले पाहिजे असे वक्तव्य केले, तेव्हापासूनच ड्रोन हल्ले सुरू झाले. हे ड्रोन कोणी पुरविले, कुठून आले आणि कोण या ड्रोनचे संचालन करीत आहे याबाबतीत अजूनपर्यंत तरी शोध लागलेला नाही. अतिरेकी जर हल्ला करताना आढळले तर त्यांना पकडता येईल किंवा त्यांना ठार करता येईल, परंतु स्फोटक सामग्रीसह ड्रोन कुणी पाठविले याची माहितीही मिळत नाही. पाकिस्तान काश्मिरमध्ये राहणार्‍या पार्ट टाईम अतिरेक्यांची मदत घेत आहेत.