आरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती

सरकारने तयार केलेल्या सडकांवर खासगी वाहने चालू शकतात तर रेल्वे रूळांवरून खासगी रेल्वेगाड्या का धावू शकणार नाहीत? रेल्वेमार्गही तर सरकारनेच बनविले आहेत, असे मत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्‍त केले आहे.

    सडक मार्ग सरकारनेच तयार केलेले आहेत, त्यामुळे या मार्गावर केवळ सरकारी वाहनेच चालतील, असे कोणीही म्हणणार नाही. खासगी रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या संदर्भात बोलताना गोयल यांनी असे प्रतिपादन केले की इ.स. १९५६ मध्ये रेल्वेचे राष्ट्रीयीकरण होण्यापूर्वी भारतात खासगी कंपन्यांच्या रेल्वे गाड्या चालत होत्या. त्यावेळी ‘जीआयपी (ग्रँड इंडियन पेनिनसुला) आणि बीएनआर (बंगाल- नागपूर रेल्वे) या खासगी कंपन्या होत्या. किलिक निकसन या ब्रिटिश कंपनीची शकुंतला ही रेल्वे गाडी विदर्भातील कापूस उत्पादक क्षेत्रात चालत होती. काही दिवसापूर्वीच ही गाडी बंद झाली आहे.

    रेल्वेच्या राष्ट्रीयैकरणानंतर बीएनआरचे रूपांतर दक्षिण-पूर्व रेल्वेमध्ये झाले. जुलय ऐल्वााहर्याना वाफेचे इंजिन असायचे. त्या रेल्वेगाड्या चालायच्या. त्यानंतर डिझेल इंजिन आले आणि आता रेल्वेगाड्यांना विद्युत्‌. इंजिन लागलेले असते. रेल्वेचा प्रवास अधिक सुविधाजनक आणि आरामदायी असावा, असे प्रवाशांना वाटते, त्यादृष्टिने सुविधा करण्यात आलेल्या आहेत. ‘तेजस’ ही भारतातील पहिली ट्रेन खासगी क्षेत्रात सुरू आहे. आयआरसीटी द्वारे संचालित लखनौ-नवी दिल्ली तेजस एक्सप्रेसचे उद्‌घाटन ४ ऑक्टोबर २०१९ ला झाले. अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस ही रेल्वेगाडी सुद्धा आयआरसीटीसीद्वारे चालविण्यात येत आहे. मुंबई ते गोवा आणि चेन्नई ते मदुराई दरम्यानही तेजस एक्सप्रेस सुरू आहे.

    तेजस एक्सप्रेस ही १४ डब्यांची गाडी असून प्रत्येक डब्यामध्ये ७२ प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे. याशिवाय २ एक्झिक्युटिव्ह कोच आहेत, यामध्ये प्रत्येकी ५६ प्रवासी बसू शकतात. अशाप्रकारच्या खासगी ट्रेनमध्ये एहईडी टीव्ही, चहा-कॉफी बनविण्याची मशीन आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेजस एक्सप्रेसचे भाडे शताब्दी एक्सप्रेसच्या भाड्यापेक्षा २० ते ३० पटीने जास्त आहे. या गाड्यांना स्वयंचलित दरवाजे आहेत. या सेमि हायस्पीड गाड्या जास्तीत जास्त २०० किलोमिटर प्रतितास या वेगाने धावतात. ज्यांना आनंददायी प्रवास करायचा असतो ते लोकच या गाड्यांना पसंत करतात.