निवडणुका होताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ…

    पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ होऊ लागली आहे. 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे पेट्रोल -डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. परंतु निवडणुकांचे निकाल जाहीर होताच पुन्हा भावात वाढ होऊ लागली आहे.

    ‘एकीकडे सरकार म्हणते की, पेट्रोळ-डिझेळच्या भावावर सरकारचे नियंत्रण नसते, पेट्रोळ डिझेळ उत्पादक कंपन्याच या उत्पादनाचे भाव ठरवितात, परंतु 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकादरम्यान मात्र 18 दिवसपर्यंत पेट्रोल – डिझेलचे भाव ‘जैसे थे’ ठेवण्यात आले. निवडणुका होईस्तोवर भाव जैसे थे ठेवण्यात यावे, असे संकेत सरकारनेच या कंपन्यांना दिले असेल, असे बोलले जात आहे. जर निवडणुकादरम्यान पेट्रोल – दरवाढ केली असती तर जनता नाराज झाली असती आणि त्याचा परिणाम सरकारपक्षाच्या उमेदवाराच्या मतदानावर निश्चित झाला असता. 2 आठवडे पेट्रोल – डिझेळचे भाव स्थिर होते आणि आता निवडणुका संपताच पुन्हा पेट्रोल – डिझेल कंपन्यांनी दरवाढ करणे सुरू केले आहे.

    मागील तीन दिवसांपासून पेट्रोल – डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. तेल कंपन्या आपला तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोलचे दर प्रतिलिटर 5.50 रु. तर डिझेल प्रतिलिटर 3 रु. वाढवू शकते. भारताच्या तुलनेत नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशात पेट्रोल-डिझेल स्वस्त आहेत. पेट्रोळ-डिझेळची मूळ किंमत 30 रुपयांपेक्षाही कमी आहे, परंतु केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोलवर कर आकारतात परिणामी किमतीमध्ये वाढ होत असते. राज्य आणि केंद्र सरकारचे महसूलप्राप्तीचे हे मोठे साधन आहे आणि म्हणूनच पेट्रोळ-डिझेळवर जीएसटी लावण्यात येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही सरकारने त्याचा फायदा ग्राहकांना घेऊ दिला नाही. कारण या काळातही पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी भाव कमी केले नव्हते. आता देशात लॉकडाऊन सुरू आहे. पेट्रोळ-डिझेळचा वापर कमी झालेला आहे, तथापि तेल कंपन्यांनी किमती कमी करण्याऐवजी पेट्रोळ- डिझेलचे दर वाढवून दिळे आहेत. डिझेल महाग झाल्यामुळे अन्य वस्तूंच्या किमतीही वाढू लागल्या आहेत.