politics of corona virus vaccine

कोरोना (corona) महामारीच्या राजकारणाने (politics) जगाच्याच अर्थकारणाला (world economy) खीळ बसलेली आहे. जगातील अधिकांश देशांमध्ये कोरोनाच्या अस्तित्वामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोनामुळे चीन (China) देशाला जगाच्या कानाकोपर्‍यातून अपशब्दांची लाखोळीही वाहण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या राजकारणाने जगाच्याच अर्थकारणाला खीळ बसलेली आहे. जगातील अधिकांश देशांमध्ये कोरोनाच्या अस्तित्वामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोरोनामुळे चीन देशाला जगाच्या कानाकोपर्‍यातून अपशब्दांची लाखोळीही वाहण्यात आली आहे.

प्रत्येकजण कोरोनाशी संघर्ष करत आहे. डॉक्टर, परिचारिका तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी आपले प्राण पणाला लावून कोरोनाशी संघर्ष करत आहे. कोरोना काळात राजकारण विसरून प्रत्येक जण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना विरोधात समाजसेवेचे कार्य करत आहे. परंतु राजकारणी मंडळी ‘कोरोनावरूनही राजकारण (politics) करण्याची संधी सोडत नाहीत, हे जगाच्या पाठीवर केवळ आपल्याच भारतात पहावयास मिळत आहे.

जगातील सर्वाधिक मोठे लोकशाही राष्ट्र म्हणविणाऱ्या भारत देशाची ही एक प्रकारची शोकांतिकाच म्हणावी लागेल, भारतात सध्या बिहार राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सत्ता संपादनासाठी प्रचारादरम्यान बिहारच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात बिहारमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास राज्यात सर्वांना मोफत कोरोना लस देण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले आहे. कोरोनाच्या महासाथीत संपूर्ण जग अस्थिर झाले असता असे आश्‍वासन एखादा राजकीय पक्ष जनतेळा कसे देऊ शकतो हा प्रश्‍न आहे. एका पक्षाने राजकीय घोषणा केल्यावर राजकीय चढाओढीसाठी अन्य पक्षानेही त्याबाबत प्रतिघोषणा करणे हा भारतीय राजकारणाचा एक भागच बनला आहे. भाजपच्या अशा आश्‍वासनाचे अन्य अर्थही निघू शकतात. समजा भाजपला बिहारच्या जनतेने नाकारले तर हा पक्ष बिहारच्या जनतेला मोफत कोरोना लस देणार नाही का? आणि बिहारशिवाय अन्य राज्यांना कोरोनावरची मोफत लस मिळणार नाही का? कोरोना महासाथीने सर्वांचेच जीवन ढवळून निघाले आहे. यात कोणाला लस मोफत नको आहे? लस बाजारात आल्यानंतर प्रत्येक नागरिकाला तो घेण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत मतांच्या बदल्यात मोफत लस देऊ असे म्हणणे म्हणजे शुद्ध लाच देण्यासारखे आहे. भाजपच्या मोफत कोरोना लसीला महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रातीळ जनतेला कोरोनावरीळ लस मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. मुळातच कोरोनावरची लस दृष्टीक्षेपात नसताना व कधी येईल याबाबत निश्चित तारीख माहिती नसतानाही कोरोनाने त्रस्त झालेल्या जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे.