तिसरी आघाडी स्थापन्याची तयारी; आता सोनियाऐवजी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी इतर पक्षांनी पुढाकार घ्यावा

देशात (India) वेळोवेळी तिसरी आघाडी (Third Front) स्थापन झालेली आहे. तेव्हा असे राजकीय पक्ष एकत्र (political parties together) आले होते की, जे काँग्रेस (congress) आणि भाजपला (BJP) पर्याय निर्माण करू शकत होते.

  व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाचे सरकार, देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांची संयुक्‍त आघाडीची सरकारे ही तिसर्‍या आघाडीची उदाहरणे आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नुकतेच असे संकेत दिळे आहेत की, राकाँचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.

  केंद्रातील सत्तारूढ भाजपा सरकारवर अंकुश लावण्यासाठी देशात विरोधी पक्षाच्या संयुक्त आघाडीची सध्या नितांत आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर संयुक्त आघाडी स्थापन करण्यासाठी राकाँ नेते शरद पवार यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. लवकरच याबाबतीत पुढाकार घेण्यात येईल.

  राऊत यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले की, आता सोनिया गांधी यांच्याऐबजी शरद पवार हे युपीएचे नेतृत्व करतील. निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सतत पराभव होत असल्यामुळे काँग्रेसची प्रतिमा डागाळलेली आहे. बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांतील बिधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए बेचैन आहे.

  इ. स. २०१४ पासून आतापर्यंत मोदींचा मुकाबला करण्यास काँग्रेसपक्ष कमजोर ठरलेला आहे. पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या चार राज्यांमध्येच सध्या काँग्रेसची सरकारे आहेत. संजय राऊत यांनी जेव्हा सोनिया गांधी यांच्याऐवजी शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात यावी, अशी सूचना केली होती, तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्‍त करून शिवसेनेच्या नेत्यांना याबाबतीत बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हटले होते.

  आता विधानसभा निवडणुकीमधील काँग्रेसच्या पराभवानंतर संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात तीन पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले व हे सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारची आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व पक्षांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. अनुभवी आणि दिग्गज नेते शरद पवार यांचे सर्वच पक्षांसोबत मधुर संबंध आहेत. ज्या प्रादेशिक पक्षांना राहुल गांधींचे नेतृत्व मान्य नाही, ते सर्व पक्ष पवारांना सहकार्य करण्यासाठी निश्चितच पुढाकार घेऊ शकतील.

  Preparation for the establishment of the Third Front Now other parties should take initiative to support Sharad Pawar instead of Sonia Gandhi