Prime Minister if the President gets vaccinated first credibility will increase nrvb
पंतप्रधान, राष्ट्रपतींनी प्रथम लस घेतल्यास विश्‍वासार्हता वाढेल

ज्याप्रकारे या दोन्ही लसींना मंजुरी देण्याय आली आहे, ते आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधी आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय 'लसीला मंजुरी देणे चुकीचे असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, भाजपाला या संदर्भात त्यांची विश्‍वासार्हता सिद्ध करण्याची आवश्यकता आहे.

कोरोना महामारीवर लस येणे ही मोठी बाब आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅकसीन या दोन्ही लसींना ‘डीसीजीआय’ने अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही ‘लसींना फ्रीजमध्ये ठेवता येऊ शकेल. या लसींचे आता देशभर वितरण करण्यात येईल.

भारतीय संशोधकांनी कोव्हॅक्सीन ही लस तयार करून संपूर्ण जगात आपली कुशलता सिद्ध केलेली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संशोधकांची प्रशंसा केलेली आहे. भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी या लसींचे संशोधन महत्त्वाचे पाऊल आहे. कोणतीही नवीन वस्तू जेव्हा बाजारात येते, तेव्हा त्या वस्तूंबद्दल अनेक शंका- कुशंका घेतल्या जातात. या लसीबद्दलही तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. या सर्व शंका दूर करून जनतेला आश्वस्त करणे हे सरकारचे कार्य आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश आणि शशी थरुर यांनी या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्यापूर्वीच लसीला मंजुरी दिल्याबद्दल काही प्रश्‍न उपस्थित केलेले आहेत. याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना स्पष्टीकरणही मागितले आहे. ज्याप्रकारे या दोन्ही लसींना मंजुरी देण्याय आली आहे, ते आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विरोधी आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ‘लसीला मंजुरी देणे चुकीचे असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, भाजपाला या संदर्भात त्यांची विश्‍वासार्हता सिद्ध करण्याची आवश्यकता आहे.

आपलं मत नोंदविण्यासाठी येथे क्लिक करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम लस घेऊन या लसीबद्दल जनतेत विश्‍वास निर्माण करायला पाहिजे होता. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्व केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, न्यायाधीश यांना प्रथम लस द्यायला पाहिजे होती. असे केले असते तर या लसीबद्दल जनतेमध्ये विश्‍वास निर्माण झाला असता. ही काही टीका-टिप्पणी करण्याची गोष्ट नाही, सर्व विकसित देशांमध्ये राष्ट्रपती व पंतप्रधानच लस घेतात. रशिया आणि अमेरिकेत तेथील राष्ट्रप्रमुखांनी लस टोचून घेतली आहे, तेव्हा भारतात असे करण्यास काय अडचण होती. यामुळे दोन फायदे झाले असते, एक तर आमचे नेते कोरोना संक्रमणापासून सुरक्षित झाले असते आणि दुसरी बाब म्हणजे विरोधकांना शंकेला वाव मिळाला नसता. ही लस प्रथम देशातील २ कोटी कोरोना योद्धयांना दिली जाणार आहे. नेत्यांनी प्रथम टिका घेतला असता तर देशातील करोडो जनतेचे मनोबल वाढले असते.