शाळा सुरु करण्याचा योग्य सल्ला

आरोग्यासोबतच शिक्षणावरसुध्दा कोरोना महामारीचा विपरीत परिणाम झालेला आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकणावर विसंबून राहावे लागत आहे.

    ज्या कुटुंबांकडे मोबाइल, लॅपटॉप नाही त्या कुटुंबातील मुले व शिक्षणापासून वंचित झालेले आहेत किंबहुना ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे तेथील मुले तर शिक्षणाला पारखे झाले आहेत. तसेही ऑनलाइन शिक्षण हे शाळतील वर्गांमधे जे शिक्षण दिले जाते त्या शिक्षणाचा पर्याय ठरु शकत नाही. मार्च 2019 मध्ये कोरोनाची जी पहिली लाट आली होती, तेव्हापासून देशातील सर्व शाळा बंद आहेत परिरामी विद्यार्थ्यांचा शैक्षक विकास पूर्णपणे थांबलेला आहे.

    शाळांमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त खेळ आणि शिक्षणाला पूरक असे विविध उपक्रमही होतात, परंतु शाळाच बंद असल्यामुळे हे सर्व उपक्रम थांबलेले आहते. ऑनलाइन शिक्षणामध्ये असे कोणतेही उपक्रम घेणे शक्य नाही. अशा परिस्थितीत एम्सचे निर्देशक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी योग्य आणि व्यावहारिक सल्ला दिलेला आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील मुलांमध्ये प्रचंड प्रतिकारक क्षमता असल्यामुळे शाळा सरु करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, त्यामुळे शाळा सुरु करण्यासाठी सर्वांनी सहमत झाले पाहिजे. ज्या ठिकाणी 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हिटी आहे तेथील शाळा सुर करण्याची योजना तयार केली पाहिजे. जर तेथे संक्रमण वाढण्याची शक्यता दिसून आली तर तेथील शाळा त्वरित बंद करता येऊ शकेल. याशिवाय जिल्ह्यातील शाळकरी मुलांसाठी एक दिवसाआड शाळेत पाठविण्यावरसुध्दा विचार करता येईल.

    याचप्रकारे आयसीएमआरचे (इंडियन कौनसिल ऑफ मेडिकल रिसर्च) डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे की, शाळा सरु कल्या जाऊ शकतात, कारण मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांना संक्रमणाचा धोका कमी असतो. युरोपमध्ये अनेक देशांत कोरोना वाढत असतानाही तेथील शाळा सुर करण्यात आलेल्या आहेत. सुरवातीला प्राथमिक शाळा सुरु कराव्यात आणि त्यानंतर हळूहळू सेकंडरी स्कूल सुध्दा सुर करावेत. विद्यार्थी शाळेत येऊ लागल्यानंतर त्यांची शाळेत वैदकीय तपासणी करण्याची व्यवस्था संबंधित शाळेमार्फत करणयात आली पाहिजे. एखादा मुलगा जर बाधित असला तर शाळेतील अन्य मुलांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे शाळा सुर झाल्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने दक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे.