इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा

निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना लाच देणे, त्यांना विशिष्ट उमेदवारांनाच मतदान करण्यास बाध्य करणे असे प्रकार भ्रष्ट निवडणूक पद्धतीचे द्योतक आहे. असे करणे गैर असतानाही हे मात्र सर्रास सुरू असते.

    युद्ध, प्रेम आणि निवडणुकीमध्ये हे चालतच असतात, असे उमेदवारांना वाटत असते. या प्रकरणी तक्रारी करनपुखद्धा कोणतीही कारवाई होत नाही. परंतु यावेळी मात्र असे काहीही झाले नाही. तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरसी) खासदार कविता एम आणि त्यांचा एक सहकारी शौकत अली यांना मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने त्यांना 6 महिन्याचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला.

    मतदारांना लाच दिल्याच्या आरोपावरून उमेदवाराला शिक्षा होण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. इ. स. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कविता एम. आणि त्यांचा सहकारी शौकत अली यांना मतदारांना प्रत्येकी 500 रुपये देत असताना रंगेहात पकडण्यात आले होते. कविता यांनी मतदान करण्यासाठी आम्हाला 500 रुपये दिल्याचे मतदारांनी न्यायालयात सांगितले होते.

    निवडणूक प्रचारादरम्यान झोपडपट्टयांमध्ये रोख रक्‍कम, मद्य, भांडे, कपडे वाटप करण्यात येते. हे प्रकार सरास चाळतात, परंतु याबाबतीत कोणतीही कारवाई मात्र होताना दिसत नाही. कितीतरी उमेदवार पैसा आणि दंडेली करून मतदारांना धमकावतात व मतदारांना आपल्याळाच मतदान करण्यास बाध्य करतात.

    दहशत आणि भीतीपोटी मतदारही त्याच उमेदवारांना मतदान करतात. त्यामुळे कित्येक अपात्र उमेदवार विजयी होत असते. दक्षिण भारतात तर मतदारांना सर्रास प्रलोभने देण्यात येतात. तामिळनाडूमध्ये एका निवडणुकीत अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता आणि द्रमुक नेते एम. करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षामध्ये मतदारांना प्रलोभने देण्याची जणू शर्यतच लागलेली होती. जयललिता यांच्यावर मतदारांना रंगीत टीव्ही दिल्याचे आरोप होते. तेथील लोकही निवडणुकीत मोफत वस्तू मिळण्याची जणू प्रतीक्षाच करीत असतात.

    निवडणुकींमध्ये नेते केवळ पैशाचेच वाटप करीत नाही तर कधीही पूर्ण न होणारे आशश्‍वासनेही देत असतात. मग तो गरिबी हटाओचा नारा असो की, प्रत्येक भारतीयांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन असोत. ही सर्व आश्‍वासने मृगजळच ठरली आहेत!