Rahul Gandhis acceptance to accept the presidency of the Congress nrvb

ज्योतिरादित्य शिंदे यांनासुद्धा पक्ष सांभाळू शकला नाही, परिणामी मध्यप्रदेशातून पक्षाला सत्ता गमवावी लागली. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे त्याचे दुष्परिणाम पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांची पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करावी, अशी काही नेत्यांची इच्छा आहे.

काँग्रेस पक्ष आता अनिश्चिततेच्या सावटातून बाहेर पडणार आहे. इ.स. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आपण राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे इतर नेतेही राजीनामे देतील व पक्षाची पुनर्बांधणी करता येईल, असे राहु गांधींना वाटत होते, परंतु त्यांच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याने राजीनामा दिला नाही. सोनिया गांधी यांची प्रकृती चांगली नसतानाही त्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली सोबतच त्या युपीएच्या चेअरमनही होत्या.

राहुल गांधी यांना अनेक नेत्यांनी समजाविले, परंतु ते पुन्हा पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार झाले नाही. अशा परिस्थितीत ज्योतिरादित्य शिंदे यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. सचिन पायलट यांनीही बंडाचा झेंडा हाती घेतला होता, परंतु काही नेत्यांनी त्यांना समजाविल्यानंतर त्यांनी बंडखोरीपासून माघार घेतली.

आपले मत नोदविण्यासाठी येथे क्लिक करा.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत त्यांचे मुळीच पटत नव्हते. अनेक मुद्यांवर मोदी सरकारला आव्हान देण्यास काँग्रेस पक्ष कमजोर पडू लागला. दरम्यान पक्षाच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या एकूण परिस्थितीबाबत चिंता व्यक्‍त केली होती. काँग्रेसची परिस्थिती अशी झाली आहे की, लोकसभेत या पक्षाला अधिकृत विरोधी पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक ती एक दशांश सदस्य संख्याही मिळविता आलेली नाही, त्यामुळे पक्षाला सभागृहात विरोधी पक्षाचा दर्जासुद्धा नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांनासुद्धा पक्ष सांभाळू शकला नाही, परिणामी मध्यप्रदेशातून पक्षाला सत्ता गमवावी लागली. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे त्याचे दुष्परिणाम पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांची पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करावी, अशी काही नेत्यांची इच्छा आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी राहुल गांधीकडे पुन्हा पक्षाचे नेतृत्व सोपवावे, अशी मागणी केली आहे. यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही हीच मागणी उचळून धरली आणि आता राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होण्यासाठी तयार झालेले आहेत. काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे की, गांधी कुटुंबीयाशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्यायच नाही. पक्ष कितीही कमजोर अवस्थेत असला तरी गांधी कुटुंबीयच पक्षाला एकजूट ठेवू शकतो. राहुल गांधी जर पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी पक्षासाठी पूर्णवेळ दिला पाहिजे. पक्षाच्या जुन्या नेत्यांचा अनुभव आणि नवीन नेत्यांचा उत्साह याचा योग्य समन्वय साधून पक्षाला पुढे नेण्याची नितांत आवश्यकता आहे.