संजय गांधी पॅटर्नवर राहुल

राहुल गांधी यांनी कॉंग्रेसची सुत्रे हाती घेतली तेव्हापासून पक्षांतर्गत सुभेदारी निर्माण करणाऱ्या वयोवृद्ध नेत्यांनी त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यापेक्षा तो कसा ओसरेल याकडे अधिक लक्ष केंद्रित केले होते. यातून कॉंग्रेसमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी सलग ते झुंज देत आहेत. राहुल गांधी हे कॉग्रेसाध्यक्षापदाची धुरा सांभाळण्यात अपयशी कसे ठरतील हे काम बड्या नेत्यांनी एकसंघ होऊनच केले असावे.

सोमवारी राहुल गांधी यांनी जे भडक वक्तव्य केले ते ४ वर्षाच्या काळात त्यांच्या मनात खदखदणारा जो ज्वालामुखी होता तो बाहेर पडला. ७० च्या दशकात इंदिरा गांधीची सत्ता व त्यानंतर आणीबाणीपासून पुन्ही इंदिरा गांधीच्या उद्यादरम्यान त्यांचे सुपुत्र संजय गांधी यांची जी भूमिका व उत्साह होता तसेच संघटन व सत्तेत त्यांचा जो दबाव होता तो बघून त्यांना तेव्हा सुपर पीएम म्हटले गेले होते. आणीबाणीनंतर जेव्हा इंदिरा गांधीना तुरूंगात जावे लागले. तेव्हा संजय गांधींनी तरूणकर्त्यांना सोबत घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रचंड शक्ती निर्माण करण्याचे काम केले. ८० च्या दशकात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यात तोपर्यंत संजय गांधी यांनी पक्षावर पूर्णत: नियंत्रण मिळवले होते. अगदी त्याच उत्साहात राहुल गांधी यांनी कॉंग्रेसची सुत्रे हाती घेतली तेव्हापासून पक्षांतर्गत सुभेदारी निर्माण करणाऱ्या वयोवृद्ध नेत्यांनी त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यापेक्षा तो कसा ओसरेल याकडे अधिक लक्ष केंद्रित केले होते. यातून कॉंग्रेसमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी सलग ते झुंज देत आहेत. राहुल गांधी हे कॉग्रेसाध्यक्षापदाची धुरा सांभाळण्यात अपयशी कसे ठरतील हे काम बड्या नेत्यांनी एकसंघ होऊनच केले असावे.

पक्षातील एका मोठ्या वर्गाने खुटीउपाड तसेच शेखचिल्लीचे काम सुरू केल्यामुळे तुरूणतुर्क उत्साही नेत्यांची पक्षांतर्गत फार मोठी गोची झाली. ज्यांनी कॉंग्रेस पक्षात राहुन खुटीउपाड कामे केलीत ते २३ शेखचिल्ली भाजपचे एजंट असल्याचा थेट आरोपच राहुल गांधींनी केला. त्यांच्या या आरोपामुळे मनातून ते किती संतप्त झाले असतील याचा विचार करता येईल. त्यांच्या या वक्तव्याने कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची भिती निर्माण झाली आहे. सन २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये कॉंग्रेसने सत्ता प्राप्त केली. तेव्हापासून कॉंग्रेसच्या शेखचिल्ली वयोवृद्ध नेत्यांनी सोनिया गांधीच्या निकटतेचा फायदा घेऊन नवा खेळ सुरू केला. राहुलच्या सहकाऱ्यांना दुधातून माशी काढल्यांगत दूर फेकले. त्यांना अपमानित करण्याचे काम सुरू केले. राहुल गांधी अपयशी कसे ठरतील यासाठी सारिपाटावर सोंगट्या बसविल्या गेल्यात. पर्यायाने राहुल गांधींनी कॉंग्रेसाध्यक्षपदाचा राजीनामा फेकला. पक्षाचा लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव झाला. राहुल गांधी यांनी कमलनाथ यांचे थेट नाव घेऊन समीक्षा बैठकीत खळबळ उडवून दिली होती.

कमलनाथ यांनी केवळ छिंदवाडा जागा जिंकण्यासाठी मध्यप्रदेशात प्रचार केला. या एका जागेसाठी ते तन-मन-धनाने कार्यरत होते. ज्योतिरादित्य शिंदेनीच हा फिडबॅक राहुल गांधींना दिला होता. त्यानंतर कमलनाथ यांच्या निशाण्यावर ज्योतिरादित्य आलेत. त्यांनी त्यांना टार्गेट करून मध्यप्रदेशात प्रभावहीन करण्याचे काम सुरू केले. पर्यांयाने ज्योतिरादित्य शिंदेसारख्या प्रभावशाली नेत्याला कॉंग्रेस सोडावी लागली. सोनिया गांधीना पक्षांतर्गत खुटीउपाड नेत्यांच्या सवयी व कारनामे ज्ञात नाहीत असा भागच नाही. सर्वकाही माहिती असताना सोनिया गांधी चुप्पी साधून होत्या. काही वयोवृद्ध नेत्यांनी सोनियांच्या मनात राहुल यांच्या सहकाऱ्यांबाबत विष भरले. असाच प्रकार इंदिरा व संजय गांधीच्या काळात झाला होता. सोनिया-राहुल यांची मने यातूनच दुभंगण्याच्या स्थितीत असताना प्रियंकांनी हस्तक्षेप करून राहुल यांना घरापासून दूर होऊ दिले नाही. सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाताच घेताच राहुल गांधींना यात प्रियंकांनी हस्तक्षेप करण्यासा सांगितले. यातून राजस्थानचे गहलोत सरकार बचावले.

कॉंग्रेमध्ये राहुल नीलकंठ झाले होते. वयोवृद्ध खुटीउपाड नेत्यांचे विष प्राशन करीत राहिले. आता कॉंग्रेस पक्षात थेट दोन गट उभे झालेत हे स्पष्ट आहे. सोनिया गांधींचा एक गट तर राहुल-प्रियंकाचा दुसरा गट, सोमवारी सीडब्लूसीमध्ये राहुल गांधींनी वयोवृद्धांना वेशावर टांगल्यामुळे कॉंग्रेसमध्ये प्रचंड खळबळ उडाली. २३ वरिष्ठ नेत्यांना त्यांनी जो झटका त्यांची नशाच उतरली. यापैकी ९९ टक्के नेते आपल्या गावात सरंपचपदाची निवडणूकही जिंकू शकत नाहीत. गांधी घराण्यात आता महाभारताचा शंखनाद झाला हे सूर्यप्रकाशाइतके सत्य स्वीकारावे लागेल. या महाभारताचा अंत कॉंग्रेसला खुटीउपाड नेत्यांपासून मुक्त करेल हे तेवढेच खरे.