raj thakre

राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय न घेतल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या पुजाऱ्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली.

महाराष्ट्रात मॉल उघडले जाऊ शकतात तर मंदिरे का उघडली जाऊ शकत नाही? असा प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. राज ठाकरे यांचा हा प्रश्न संयुक्तिक वाटतो. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करणयात आले. या दरम्यान राज्यातील सर्व मंदिरेही बंद करण्यात आली आहेत. आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे, परंतु अजूनही धार्मिक स्थळे मात्र बंदच आहेत. मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करुन ज्याप्रमाणे मॉल्स सुरु करण्यात आले. त्याचप्रमाणे मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारासुद्धा उघडले जाऊ शकतात. धार्मिक स्थळं तर बंद ठेवल्यामुळे कित्येक लोक दुःखी आहेत. या सर्व लोकांना घरीच पूजाअर्चा, प्रार्थना करावी लागत आहे. इच्छा असूनही मंदिरात जाऊ शकत नाही. श्रावण महिन्यातील सर्व सणांवर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. ही बाब केवळ भाविकांशीच जुळलेली नाही. तर मंदिर परिसरातील पूजेची सामग्री-नारळ, हार-फुले, विकणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. कित्येक लोक बेरोजगार झालेले आहेत. जे भिकारी भिक्षा मागून पोट भरत होते. त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आलेली आहे. राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय न घेतल्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या पुजाऱ्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आपली व्यथा मांडली. राज ठाकरे यांनी या पुजाऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन केले आहे. मंदिरे उघडण्याबाबत एक नियमावली तयार करण्यात येईल आणि ती सरकारला सादर करण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. जर महाराष्ट्रात मॉल उघडल्या जाऊ शकते तर मंदिरे उघडण्याची परवानगी का दिली जात नाही, असा सवालही ठाकरे यांनी केला आहे. लोकांच्या भावनांचा मनसे नेहमीच सन्मान करते, असेही ते म्हणाले आ. रोहित पवार यांनी मंदिर आणि धार्मिक स्थळं उघडण्यात यावी, असे ट्विट केले आहे. आस्थेबाबतच मंदिराशी अनेक लोकांची रोजी-रोटी निगडीत आहे. मोठ-मोठ्या संकटाचा सामना करण्यामध्ये आस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. आस्थेमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास वाढत असतो. सरकारने याबाबतीत गांभीर्याने विचार करावा व योग्य निर्णय घ्यावा.