राज्यातील रेस्टॉरंट, बिअर बार पुन्हा सुरु होणार

रेस्टॉरंट बंद करण्यात आल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले होते. आता पुन्हा हे हॉटेल सुरु होत असल्यामुळे ग्राहकांनाही आता नवीन पदार्थ खायला मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोरोनासोबत जीवन व्यक्त करताना सावधान राहावे लागणार आहे.

कोरोना महामारिमुळे बंद करण्यात आलेलेल रेस्टॉरंट (Restaurants) व बिअर बार (beer bars ) नवरात्रोत्सवापूर्वी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सुरु (reopen) करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. राज्यातील बंद असलेले सुमारे ४ लाख रेस्टॉरंट आणि बिअर बार सुरु करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रेस्टॉरंट व बिअर बारमधील लाखों कर्मचाऱ्यांना पुन्हा रोजगार मिळणार आहे. रेस्टॉरंट बंद करण्यात आल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले होते. आता पुन्हा हे हॉटेल सुरु होत असल्यामुळे ग्राहकांनाही आता नवीन पदार्थ खायला मिळणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोरोनासोबत जीवन व्यक्त करताना सावधान राहावे लागणार आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. हॉटेल उद्योग बंद ठेवण्याचा सरकारचा विचार नव्हता, परंतु परिस्थितीच तशी होती की, हा व्यवसाय बंद ठेवावा लागला. हॉटेल उद्योग बंद असल्यामुळे टॅक्सच्या स्वरुपात सरकारला मिळणारा महसूलही बंद झालेला आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळणारे जीएसटीचे करोडो रुपये अजूनही मिळालेले नाही. तथापि, कोरोनाच्या संकटकाळात हॉटेल उद्योजक मात्र सरकारसोबत आहेत. या सर्व गाईडलाईन रेस्टॉरंट मालकांना आणि ग्राहकांना पाळाव्या लागणार आहेत. भोजन करण्यापूर्वी हात सॅनिटाईज करुन घेणे, तापमान चेक करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, रेस्टॉरंट मालकासोबतच तेथील कर्मचाऱ्यांनाही या सर्व गाईडलाईनचे पालन करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, रेस्टॉरंट मालकासोबतच तेथील कर्मचाऱ्यांनीही या सर्व गाईडलाईनचे पालनक करणे आवश्य आहे. कोरोना महामारी इतक्या लवकर संपनार नाही, परंतु सतर्कता बाळगून आपल्याला जीवन जगावे लागणार आहे. लॉकडाऊनमुळे लाखो-करोडो लोक बेरोजगार तर झाले आहेतच. सोबतच सरकारची टॅक्स स्वरुपात मिळणारी मिळकतही कमी झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील रेस्टॉरंट आणि बार मालकांशी आणि संगटनाशी चर्चा करुन अनुकूल निर्णय घेण्याचे यापूर्वी आश्वासन दिले होते.