निर्बंध नेहमीच जाचक ठरतात : सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये कुटुंब नियोजन? धोरणात शिथिलता

जगात चीनची लोकसंख्या (China Population) सर्वाधिक असून सध्या ती १.४११७८ अब्ज आहे. यामध्ये वृद्धांची (senior citizens) संख्या जास्त आहे. युवकांची (youngsters) संख्या मात्र अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि चीनने प्रजोत्पादनाच्या (Reproduction) बाबतीत जी धोरणे लागू केली होती त्यामुळे लोकसंख्येत घट झाली आहे.

    मागील ५ वर्षांपासून एका परिवाराकडे केवळ दोन मुले असावी असे धोरण चीनमध्ये होते. या धोरणामुळे चीनमध्ये जन्मदरात घट झाली आणि वृद्धांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती. यामुळे चीन सरकार चिंतित झाले होते, अखेर चीन सरकारने एका कुटुंबात ३ मुले असावीत या धोरणाला संमती दिली. लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी चीन सरकारने जे कठोर नियम केले होते, त्यामुळे चीन सरकारपुढे नवेच संकट उभे झाले होते.

    या धोरणामुळे भविष्यात उद्योगांमध्ये काम करण्यासाठी कामगार मिळणार नाही, असे चीन सरकारला वाटू लागले, त्यामुळे आता सरकारने एका कुटुंबात ३ मुले असावी, हे धोरण लागू केले. चीनमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची लोकसंख्या २६.४ कोटी आहे. २५ ते ५९ वर्षे वयोगटातील लोकसंख्या ८९.४ कोटी आहे. अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी चीन सरकारने इ.स. १९८० मध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला.

    सुरुवातीला एका कुटुंबात एकच मूल असावे असा कायदा करण्यात आळा होता, त्यानंतर इ. स. २०१६ मध्ये एका कुटुंबात २ मुले असावी असे धोरण लागू करण्यात आले. वाढती महागाई, लहान घरं, नोकऱ्यांमध्ये स्त्री-पुरुषांमध्ये भेदभाव यामुळे चिनी लोक जास्त मुलांना जन्म देण्यासाठी घाबरत होते. या कुटुंबांवर वृद्धांच्या ‘पालनपोषणाचीही जबाबदारी होती. गेल्या ४ वर्षांपासून चीनमधील जन्मदरात सारखी घसरण होत आहे. आता तर चीनमधील लोकांना असे वाटते की, ‘हम दो हमारा एक’. तथापि चीन सरकारने लोकसंख्याविषयक जे धोरण लागू केले आहे, त्यामुळे ज्या महिलांना ३ मुलं आहेत, त्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. कारण या महिलांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आता शिक्षा होणार नाही.

    Restrictions are always oppressive in the most populous China family planning Laxity in policy