चीनमध्येही पाकप्रमाणे अन्य धर्मावर निर्बंध

  • चीनमधील कम्युनिस्ट सरकार ख्रिश्चन धर्मियांवर कोपले आहे. चीनमध्ये ७ कोटी पेक्षाही जास्त ख्रिश्चन राहतात. चीनमधील अनेक राज्यामधील सरकारांनी ख्रिश्चन धर्मियांनी आदेश दिले आहेत की, त्यांनी त्यांच्या घरातील प्रभू येशूचा फोटो, येशूचा क्रॉस, येशूची मुर्ती ताबडतोब काडून टाकाव्यात. व त्याएवजी कम्युनिस्ट नेत्यांचा फोटो लावावे.

प्राचीन काळात चीनमध्ये बौद्ध धर्म होता. तेथील बहुसंख्य जनता बौद्ध धर्मिय होती, परंतु आता मात्र चीनमध्ये बौद्ध धर्माचे अस्तित्वच उरलेले दिसत नाही. नास्तिक कम्युनिस्टांच्या मते धर्म ही अफूची गोळी आहे. म्हणूनच चीनचे कम्युनिस्ट सरकार कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देत नाही. आपल्या नेत्यांशिवाय लोकांनी इतर कोणत्याही शक्तीवर विश्वास ठेवू नये. असे चिनी सरकारला वाटते. पाकिस्तानमध्ये सुद्धा तेथील गैरमुस्लिम जनतेवर नेहमी अन्याय होत असते. त्यांच्या जिविताला आणि संपत्तीला नेहमीच धोका असतो. पाकमध्ये तर अशा कित्येक घटना घडल्या आहेत, की अल्लाची निंदा केल्याचा आरोप ठेऊन गैरमुस्लिमांना पाकच्या न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. गैरमुस्लिमांच्या जमीन व घरावर कब्जा करणे आणि त्यांच्या मुलींना पळवून नेवून धर्मांतरर करायचे व तिच्याशी निकाह करायचे असे प्रकार तेथे सर्रास सुरु आहे. याची कुठेही आणि कुणीही दखलसुद्धा घेत नाही. याच पाकिस्तानने आता चिनसमोर नांगी टाकलेली आहे. पाकिस्तान चीनपुढे पुरता झुकलेला आहे. चीनमध्ये राहणाऱ्या उईगर मुस्लिमांना चीन सरकारने मशीदीत जमणे आणि नमाज अदा करण्यावर निर्बंध घातलेले आहेत. परंतु पाकिस्तान याबद्दल काहीही बोलण्यास मात्र तयार नाही. आता चीनमधील कम्युनिस्ट सरकार ख्रिश्चन धर्मियांवर कोपले आहे. चीनमध्ये ७ कोटी पेक्षाही जास्त ख्रिश्चन राहतात. चीनमधील अनेक राज्यामधील सरकारांनी ख्रिश्चन धर्मियांनी आदेश दिले आहेत की, त्यांनी त्यांच्या घरातील प्रभू येशूचा फोटो, येशूचा क्रॉस, येशूची मुर्ती ताबडतोब काडून टाकाव्यात. व त्याएवजी कम्युनिस्ट नेत्यांचा फोटो लावावे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओत्से तुंग आणि चीनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांचे फोटो लावावे असा आदेश चीन सरकारने दिला आहे. जगामध्ये ज्या देशात प्रभू येशू ख्रिस्त आणि ख्रिश्चन धर्माला मानल्या जातात, त्या प्राश्चिमात्य देशांना चीनचे हे जाहीर आव्हानच आहे. चीनमध्ये लोकशाही ना धार्मिक सहिष्णूता, तेथे फक्त कम्युनिस्टांची हुकुमशाही आहे. तेथे कोणतेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. चीनमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत. जगातील ख्रिस्ती समाज तेथील ख्रिस्ती जनतेवर होणारे अत्याचार सहन करणार आहे का?