रशिया, चीन, उ.कोरियात विरोधी नेत्यांची करतात हत्या!

नवाल्नी यांच्या सचिवांनी त्यांना चहामधून विष देण्यात आले असावे. अशी शंका उपस्थित केली. मागील वर्षीही त्यांना तुरुंगात विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. रशियाच्या सत्ताधाऱ्यांना त्यांना विरोध करणारे मुळीच पसंत नसतात.

रशियाच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना कायमचे संपविणे ही काही नवीन बाब नाही. चीन आणि उत्तर कोरियामध्येही अशीच परिस्थिती आहे. या देशातील सत्ताधारी पूर्णपणे हुकूमशहा आहेत, आणि त्यांना विरोध करणारे नेते मुळीच आवडत नसतात. ज्या नेत्यांनी त्यांना पुतीन यांनी रशियाची संसद ड्युमामध्ये त्यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ २०३६ पर्यंत वाढवून घेतला. तसे विधेयक त्यांनी ड्युमामध्ये मंजूर करुन घेतले, म्हणजे पुढील १६ वर्षेपर्यंत पुतीन यांनी त्यांचे राष्ट्रपतिपद सुरक्षित केले. पुतीन यांचे कट्टर विरोधक राहिलेले ४४ वर्षीय अलेक्सी नवाल्नी हे सैबेरियातून मास्कोला परत येत असताना विमानात त्यांची प्रकृती बिघडली. ओनास्क येथे विमान उतरविल्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवाल्नी यांच्या सचिवांनी त्यांना चहामधून विष देण्यात आले असावे. अशी शंका उपस्थित केली. मागील वर्षीही त्यांना तुरुंगात विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. रशियाच्या सत्ताधाऱ्यांना त्यांना विरोध करणारे मुळीच पसंत नसतात. स्टॅलिन जेव्हा रशियाचे सर्वेसर्वा होते, तेव्हा त्यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी लेवरांती बेरिया यांची हत्या केली होती. याचप्रमाणे रशियन हुकूमशहांना विरोध करणारे प्रसिद्ध लेखक बोरिस पास्तरनेक यांची सैबैरियाच्या तुरुंगात हत्या करण्यात आली होती. त्यांनी कॅन्सर वार्ड हे पुस्तक लिहून खळबळ उडवून दिली होती. पुतीन यांचे एक विरोधक प्योत्र वजीलोव्ह यांच्यावरही इ.स. २०१८ मध्ये विषप्रयोग करण्यात आला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे त्यांचे निधन झाले. पत्रकार बोरिस नेमत्सोव्ह यांनाही क्रेमलीनजवळील पुलावर गोळ्या घालून ठार करण्यात आले. आणखी एक महिला पत्रकार पालिटको वासकया यांचीही मास्कोमधील एका अपार्टमेंटमध्ये हत्या करण्यात आली होती. केजीबीचे एक जुने एजंट कर्नल अलेक्झांडर लिटविनेंको इ.स. २००० मध्ये मास्कोमधून लंडनला पळून गेले आणि तेथे त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर ६ वर्षांनंतर त्यांना चहामधून विष देऊन त्यांची हत्या करण्यात आली. रशियाचे विरोधीपक्षनेते ब्लादिमिर कारामुर्जा यांना इ.स. २९१५ आणि २०१७ मध्ये विषबाधा झाली होती. चीनमध्ये तिआनमेन चौकात लोकशाहीच्या स्थापनेसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तेथील सरकारने गोळीबार केला होता. कोरियाचे हुकूमशहा किम जोंग हे सुद्धा त्यांच्या विरोधकांना गोळ्या घालून ठार करतात.