एस.टी. पुन्हा धावणार राज्यात सिटी बसेस आणि रेल्वेगाड्याही सुरु कराव्यात

राज्यात रेल्वेगाड्या आणि खासगी बसेस सुरु करण्याची परवानगी दिल्यास लोकांना आणखी सुविधा मिळेल. ही चांगली गोष्ट झाली की, राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घेण्याची किंवा पास बनविण्याची आवश्यकता नाही.

मागील ५ महिन्यापासून एस.टी. बसेस बंद असल्यामुळे लोकांना राज्यातील एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नव्हते. दुसऱ्या जिल्ह्यात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांनाही भेटणे कठीण झाले होते. फारच आवश्यकता असल्यास लोक परवानगी घेऊन खासगी वाहन भाड्याने करुन जात होते. परंतु ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. राज्य सरकारने एस.टी. बसेस सुरु करण्याची परवानगी दिली हे एकदाचे बरे झाले. आता केवळ राज्य परिवहन मंडळाच्या बसेसच राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकेल. कोणत्याही खासगी बसेसना मात्र परवानगी नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एस.टी बसेस सुरु करण्याची परवानगी दिलेली आहे. यामुळे आता ग्रामीण जनतेला मोठी सुविधा मिळालेली आहे. याप्रमाणेच राज्यात रेल्वेगाड्या आणि खासगी बसेस सुरु करण्याची परवानगी दिल्यास लोकांना आणखी सुविधा मिळेल. ही चांगली गोष्ट झाली की, राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घेण्याची किंवा पास बनविण्याची आवश्यकता नाही. एवढे मात्र आवश्यक आङे की कोरोन्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावे लागतील. बसेसला सॅनेटाईज करुनच चालवावे लागेल. बसेसमध्ये एकूण प्रवाशांच्या संख्येपेक्षा अर्धेच प्रवासी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन बसवावे लागतील. प्रवाशांना सॅनिटायझर आणि मास्क लावणे मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. बसस्टँड आणि बसेसमध्ये स्वच्छतेच्या नियमाचे पालन करावे लागेल. एस.टी. सेवा सुरु केल्यामुळे एस.टी. महामंडळाकडे पैसाही येईल. लॉकडाऊनमुळे एस.टी सेवा बंद करण्यात आली होती, त्यामुळे महामंडळाकडे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाटी सुद्धा पैसा नव्हता. जवळ जवळ १ लाख एस.टी. कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतनसुद्धा दिल्या गेले नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुमारे ३०० कोटी रुपये खर्च होत असतात. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महामंडळाने राज्यसरकारकडे पैशाची मागणी केलेली आहे.