बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरची सुरूवात थिएटर आणि टिव्हीतील मालिकांपासून केली होती. सुशांतने सर्वात प्रथम टिव्हीच्या माध्यमातून ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून आपली लोकप्रियता मिळवली. त्यानंतर त्याने अनेक हिंदी चित्रपट आणि फिल्मफेअर अवार्डसमध्ये डान्स देखील केला होता. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांकडून त्याला भरपूर प्रतिसाद व प्रेम मिळाले.

महाराष्ट्र सरकार याप्रकरणी राजकारण करीत असून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा आरोपही भाजपने केला आहे, दरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नवीनच मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि न्या. बी.एच.लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय़ चौकशी करावी, अशीही मागणी केली आहे.

संदिग्ध परिस्थितीमध्ये मृत्यू झालेले कितीतरी प्रकरणं असतात, परंतु काही दिवसानंतर त्या प्रकरणांची चर्चाही होत नाही. राजकारणांमध्ये मात्र अशी प्रकरणं उकरुन काढली जातात. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचीही या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीच भाजपने केलेली आहे. या दोन्ही नेत्यांची सीबीआयने नार्को टेस्ट करावी, अशीही मागणी भाजपने केलेली आहे. भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी शिवसेना, राकाँ आणि काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांचीही या प्रकरणी चौकशी करावी, असे म्हटले आहे. राहूल आणि प्रियंका गांधी यांनीही या प्रकरणी आता मौन सोडले पाहिजे, असे ते म्हणाले. महाराष्ट्र सरकार याप्रकरणी राजकारण करीत असून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा आरोपही भाजपने केला आहे, दरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नवीनच मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि न्या. बी.एच.लोया  यांच्या मृत्यूचीही सीबीआय़ चौकशी करावी, अशीही मागणी केली आहे. न्या. लोया यांचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झालेला आहे. आणि या प्रकरणी अमित शहा यांच्यावरही आरोप आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणीसुद्धा भाजप नेत्यावर आरोप आहेत. अशा परिस्थितीत या सर्व प्रकरणांची निःपक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. हे सर्व पाहू जाता भाजप आणि शिवसेनेची महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावावर युती आहे. यावर कोण विश्वास 

ठेवतील, सुशांतसिंग याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप करीत असेल तर गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चोकशी व्हायला पाहिजे. इ.स. २०१४ मध्ये मोदी सरकरमध्ये मंत्रिपद वर्णी लागल्यानंतर ते दिल्लीवरुन मुंबईला येण्यासाठी विमानतळावर जात असताना त्यांच्या कारला दुसऱ्या एका कारने धडक दिली. यामध्ये मुंडे यांचे निधन झाले. ही दूर्घटना समजून हे प्रकरण चौकशीविनाच दडपून टाकण्यात आले. न्या लोया यांचे मृत्यू प्रकरणही काही दिवस चर्चेत होते. परंतु हे प्रकरण उचलून धरणाऱ्यांवर प्रचंड दबाव होता. अखेर हे प्रकरण थंडबस्त्यात पडले. लोया यांच्या कुटूंबीयांनीही या प्रकरणी काही करण्यास नकार दिला होता. अशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून सुशांतसिंग यांचे मृत्यू प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे.