लोकल वोकलचे नारे आणि व्यवसायिकांची स्थिती

एकीकडे लोकल वोकलचे नारे तेजीत असताना, स्वदेशी उत्पादनांवर जोर देण्याचे आवाहन मोदी करत असताना दुसरीकडे मात्र व्यावसायिकांचे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. केंद्राकडून कोणतीच मदत प्रत्यक्षात येत

 एकीकडे लोकल वोकलचे नारे तेजीत असताना, स्वदेशी उत्पादनांवर जोर देण्याचे आवाहन मोदी करत असताना दुसरीकडे मात्र व्यावसायिकांचे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. केंद्राकडून कोणतीच मदत प्रत्यक्षात येत नाही फक्त रोज नवे नवे आकडे मात्र तोंडावर मारले जात आहेत. आज जागतिक सायकल दिन, मात्र आजच्याच दिवशी आपल्या सर्वांच्या आवडीच्या ऍटलास  च्या सायकलचे उत्पादन मात्र बंद करण्यात आले आहे. ऍटलास सायकल  हा ब्रँड जवळपास भारतात प्रत्येकाच्या ओळखीचा आहे. मात्र कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने कंपनीने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधला साहिदाबाद स्थित आपला कारखाना चालवण्यात असमर्थता दर्शविली आहे. एक पत्रक प्रसिद्ध करुन कंपनीने याबद्दल माहिती दिली आहे. 

काम सुरु झाले आणि….

साहिदाबाद येथे असलेला ऍटलास हा कारखाना १९८९ पासून कार्यरत आहे. लॉकडाऊन करण्यापूर्वी प्रत्येक महिन्याला या कारखान्यात किमान दोन लाख सायकली तयार केल्या जात असल्याचे कर्मचाऱ्यानी सांगितले आहे. दोन दिवसांपासून काम सुरु झाले. कंपनीत साफसफाई केल्यानंतर आम्ही येऊ लागलो, पण आज अचानक येथे नोटीस लावलेली पाहिली तर आम्हाला खूप वाईट वाटले कारण आता एक हजार पेक्षा जास्त कामगारांच्या कुटूंबावर उदरनिर्वाहाचे संकट आले आहे. या कारखान्यात एक हजार कामगार काम करत असल्याचे समोर आले आहे.

काय लिहिले होते नोटीसवर 

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील साहिदाबाद येथे असलेल्या सर्वात मोठ्या कारखान्यावर ऍटलास सायकल्स लिमिटेड नोटीस लावलेल्या नोटीसमध्ये कंपनीने म्हटले आहे की, आम्ही बऱ्याच वर्षांपासून एक प्रचंड आर्थिक संकटातून जात आहोत. आमचे सर्व फंड खर्च झाले आहेत. आमच्याकडे आता उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत झाला उरलेला नाही. दैनंदिन खर्चासाठी पैसैही नाहीत जोपर्यंत पैसा व्यवस्थापित होत नाहीत,  तोपर्यंत कच्चा माल देखील खरेदी करता येणार नाही, कंपनीने असे  म्हटले आहे की आशा परिस्थित आम्ही कंपनी चालवू शकत नाही. अशा परिस्थितीत संचालक कारखाना चालवण्याचा स्थितीत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी ३ जूनपासून ले-ऑफ करावे. अशी विनंती देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना केली आहे. त्यामुळे कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थिती सायकल कंपनीचे कर्मचारी चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत.