सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : महाराष्ट्र आणि बिहार आमने-सामने

जेथे घटना घडली, तेथील पोलीसच त्या घटनेची चौकशी करीत असते. महाराष्ट्रात गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. यामुळेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्रलयावर निशाणा साधला आहे. मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, जर सीबीआयचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता परवानगी न घेता मुंबईत आले तर त्यांना बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना ज्याप्रमाणे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या प्रमाणे क्वारंटाईन केले जाईल.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपविल्यामुळे शिवसेनेचा तीळपापड झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविणे हा मुंबई पोलीसांचा अपमान आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये बीहार सरकारने नियमाच्या विरुद्ध जाऊन चौकशी केल्याचा आरोप केला आहे. बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस करणे अनुचित असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारनेही सीबीआय चौकशीला मान्यता देणे चुकीचे असल्याचेही म्हटले आहे. बिहार सरकारला केवळ शून्य एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे. त्यांनी एफआयआर दाखल करुन हे प्रकरण महाराष्ट्र सरकराकडे पाठवायला पाहिजे होते. परंतु बिहार पोलीस स्वतःच प्रकरणाची चौकशी करीत आहे, असे करणे सर्वथा अनुचित आहे. बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस कसे करु शकतात? महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मुंबई पोलीस यासाठी सक्षम आहेत. जेथे घटना घडली, तेथील पोलीसच त्या घटनेची चौकशी करीत असते. महाराष्ट्रात गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. यामुळेच शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्रलयावर निशाणा साधला आहे. मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, जर सीबीआयचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता परवानगी न घेता मुंबईत आले तर त्यांना बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना ज्याप्रमाणे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या प्रमाणे क्वारंटाईन केले जाईल. बिहार आणि महाराष्ट्रामध्ये या चौकशीवरुन जे तू-तू, मैं-मैं सुरु आहे, ते पाहू जाता येत्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतात. हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सुशांतसिंग राजपूत यांच्या बँक खात्यातून करोडो रुपये काढण्यात केवळ रियाचाच हात नसून सीएसुद्धा यामध्ये सहभागी आहे. सर्वोच्च न्यायालय ११ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे, दरम्यान सीबीआयने पाटमा एसआयटीकडून या प्रकरणाची माहिती घेतली आहे. पाटणा पोलीसांनी रिया, तिचे आई-वडील आणि भावाने सुशांतसोबत धोकेबाजी केली असून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.