‘कोंगू नाडू’ची चर्चा, तामिळनाडूचे विभाजन आता होणार का?

केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश करण्यात आलेले भाजपाचे नेते एल. मुरूगन यांना 'कोंगू नाडू'चे प्रतिनिधी असा उल्लेख करण्यात आल्यामुळे नव्या चर्चेला प्रारंभ झालेला आहे.

    |भाजपा आता तामिळनाडूचे विभाजन करू इच्छित आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तामिळनाडूच्या पश्चिम विभागाला कोंगू नाडू म्हटल्या जाते. तामिळनाडूच्या संगम साहित्यात कोंगू नाडूला वेगळा प्रदेश संबोधण्यात आले आहे. यामध्ये नीलगिरी, कोईम्बतूर, तिरूपूर, इरोड, करूर, सलेव्य नामक्कल याशिवाय डिंडिगूल व धर्मापुरी जिल्ह्यातील काही प्रदेशांचा समावेश आहे. यामधील कोईम्बतूर, नामक्कल, सलेम हे जिल्हे व्यवसाय व उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यात मोठमोठ्या एमआयडीसी आहेत, तथापि तेलंगणा, विदर्भ आणि उत्तराखंडप्रमाणे कोंगू नाडूला वेगळे राज्य बनविण्याची मागणी पुढे आली नाही. तथापि, भाजपाने या नावाचा उल्लेख करून तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमकेला आव्हान दिले आहे. निवडणुकीच्या राजकारणात कोंगू नाडू असा प्रदेश आहे की, जेथे भाजपा आणि रा. स्व. संघाचा थोडाफार प्रभाव आहे. भाजपाने द्रमुकसोबत आघाडी करून पश्चिम तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 2 मतदारसंघात विजय मिळविलेला आहे. काँग्रेसने कोंगू नाडूचा उल्लेख करून यावर आक्षेप घेतला अन्‌ हा भाजपाचा अजेंडा असल्याचे म्हटले आहे.

    तामिळनाडू काँग्रेसचे प्रमुख के. एस. अलगिरी यांनी म्हटले आहे की, तामिळनाडूचे विभाजन करणे कदापिही शक्‍य नाही. द्रमुकच्या खासदार कानीमोझी यांनी म्हटले आहे की, तामिळनाडू द्रमुकच्या नेतृत्वात या क्षित आहे. अण्णा द्रमुकमधून बंडखोरी करून बाहेर टीटीबी दिनकरण यांनी अम्मा मक्कल मुनेत्रकषगम हा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे. दिनकरण म्हणाले की, तामिळनाडूचे विभाजन कदापिही सहन केल्या जाणार नाही. भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते एन. नागेंदन म्हणाले की, द्रमुक कोंगू नाडूच्या चर्चेला इतके का घाबरत आहेत. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे को, आंभ्रप्रदेश आणि उत्तरप्रदेशचेसुद्धा विभाजन झालेले आहेत.