तेजस्वी, तेजप्रतापची दादागिरी राजदमध्ये पडली फूट

लालूप्रसाद यादव यांची त्यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलावर चांगली पकड होती. ते पक्षाच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन चालत होते. परंतु त्यांची मुलं तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्यामध्ये हा गुण नाही.

 लालूप्रसाद यादव यांची त्यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलावर चांगली पकड होती. ते पक्षाच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन चालत होते. परंतु त्यांची मुलं तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्यामध्ये हा गुण नाही. त्यांच्यामध्ये जो अहंकार आहे. त्यामुळे पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. चार महिन्यांनतर बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. परंतु राजदमध्ये एकजूट दिसून येत नाही. विधानपरिषदेतील ५ आमदारांनी तर राजदला सोडचिठ्ठी देऊन नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जदयुमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राजदचे उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या विरोधकांना पक्षात सामील करुन घेण्यात येत असल्यामुळे ते नाराज होते. रघुवंश प्रसाद सिंह लालू प्रसाद यादव यांचे कट्टर समर्थक आहेत. बाहुबली नेते रामसिंह यांना राजदमध्ये प्रवेश दिल्याबद्दल रघुवंश प्रसाद सिंह नाराज झाले आणि त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन जदयुमध्ये प्रवेश केला. पाटणा येथील एम्स रुग्णालयात रघुवंश प्रसाद सिंह कोरोनावर उपचार घेत आहेत. ते म्हणाले की मी पक्षाचा राजीनामा दिला नसता, परंतु ज्या पद्धतीने आपल्या विरोधकांना पक्षात प्रवेश दिला जात आहे, याबद्दल मी फार दुखी आहे. राजदच्या ज्या ५ विधानपरिषद सदस्यांनी पक्षाचा राजीनामा दिला दिलेला आहे. ते सर्व विधानपरिषदेचे हंगामी सभापती अवधेश नारायण सिंह यांच्या दालनात गेले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याची आम्हाला परवानगी द्यावी किंवा जदयुमध्ये सामील होण्यास मान्यता द्यावी अशी मागणी हंगामी सभापतीकडे केली. सभापतींनी सर्व सदस्य़ांचे म्हणणे ऐकूण घेतले आणि त्यांना वेगळ गट स्थापन करण्यास परवानगी दिली. अशा परिस्थितीमध्ये राजदसमोर आणखी अडचण निर्माण झाली आहे. राजद नेत्या राबडी देवी विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेत्या आहेत. या नेतेपदासाठी सभागृहातील सदस्य संख्येच्या १० टक्के सदस्यसंख्या संबंधित पक्षाच्या सदस्यांची असणे आवश्यक आहे, परंतु पक्षाच्या ५ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे राबडीदेवी यांचे विरोधी पक्ष नेतेपद अडचणीत आले आहे. राजदच्या जया ५ आमदारांनी राजीनामे दिले ते नेहमीच तेजस्वी यादव यांच्या विरोधात आगपाखड करीत होते. लालू यादव यांनी सुरुवातीला आपली प्रतिमा तयार केली होती. परंतु नंतर मात्र त्यांचा प्रभाव कमी झाला. इ.स २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत राजद एकही जागा जिंकू शकला नाही. लालूप्रसाद यादव यांचे प्रकृती स्वस्थ चांगले नसते. त्यामुळे तेजस्वी त्यांच्यासोबतच राजकीय चर्चा करु शकत नाही. ओबीसी आणि गैर ओबीसीचे नेतेही राजदपासून दुरावले आहेत. त्यामुळे राजदची राज्यातील स्थिती सातत्याने ढासळत आहे.