मंदिर सुरु करण्याबाबत पूर्ण सावधानता बाळगूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी नियमांचे पालन करायचे की, लॉकडाऊनमध्ये राहायचे याचा निर्णय जनतेलाच घ्यायचा आहे.
कोरोना महामारीचा (Corona Virus) धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे अनलॉक (Unlock) करण्याची घाई करणे योग्य ठरणार नाही. तथापि, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण राज्य अनलॉक करण्यात येईल कारण लॉकडाऊनसारखी राज्यात कुठेही स्थिती नाही असे म्हटले आहे. परंतु दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, मंदिरे आणि जिम उघडण्याची वेळ सध्या आलेली नाही. मंदिरं उघडण्याची जनतेची मागणी आम्ही समजू शकतो, परंतु जनतेच्या स्वास्थ्याची जबाबदारी सरकारची आहे. (emples, gyms, schools in the state are now expected to open in December) मंदिरे बंद असल्यामुळे सरकारही दरवाजे खुले ठेवले तर त्यातून समृद्धी आली पाहिजे, कोरोना येता कामा नये, म्हणून मंदिरं बंद ठेवणेच योग्य आहे. जिम उघडण्याबाबत लवकरच नियमावली तयार करण्यात येईल. मुंबई लोकल ट्रेनच्या बाबतीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईमध्ये लोकांची गर्दी वाढविणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे लोकल ट्रेन पूर्ण क्षमतेने सुरु करता येणार नाही. राज्यातील काही ठिकाणी ट्रेनसेवा सुरु करता येऊ शकेल. काही लोक प्रार्थनास्थळं म्हणजे मंदिरं सुरु करण्याची मागणी करीत आहेत. परंतु मंदिर सुरु करण्याबाबत पूर्ण सावधानता बाळगूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी नियमांचे पालन करायचे की, लॉकडाऊनमध्ये राहायचे याचा निर्णय जनतेलाच घ्यायचा आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, जनतेच्या स्र्वास्थ्यासाठी मुख्यमंत्री कोणतीही तडजोड करु इच्छित नाही. जनतेचे स्वास्थ्य सर्वोतपरी आहे. येणारे दिवस सणासुदींचे आहेत. आणि त्या दिवसांमध्ये मंदिरांमध्ये जनतेची प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठीच मंदिरं न उघडण्याचा निर्णय घेत्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईत लोकल ट्रेन सुरु केल्या तर कोरोना महामारीचा धोका आणखी वाढू शकतो. कोरोनाची लस जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत लोकांना यापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागणार आहे. अनलॉकमध्ये सूट दिली तर त्याचे विपरीत परिणाम होतील. त्यामुळेच येत्या डिसेंबर महिन्यापूर्वी मंदिरं, जिम व शाळा सुरु होण्याची शक्यता नाही.