२०११ चा वर्ल्ड कप होता फिक्स, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्याचा खळबळजनक आरोप

इंग्लंडची क्रिकेट चमू मागील अनेक वर्षांपासून माघारलेली आहे. कर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक नवीन खेळाडू पुढे आलेले आहेत. तसे तर क्रिकेटला गेम ऑफ चांस असे म्हटले जाते. अनिश्चततेच्या या खेळामध्ये

 इंग्लंडची क्रिकेट चमू मागील अनेक वर्षांपासून माघारलेली आहे. कर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक नवीन खेळाडू पुढे आलेले आहेत. तसे तर क्रिकेटला गेम ऑफ चांस असे म्हटले जाते. अनिश्चततेच्या या खेळामध्ये उत्कृष्ट आणि चांगले खेळाडू असलेल्या चमूलाही कधी कधी पराभव स्वीकारावा लागतो तर कमजोर चमूचाही अनेकदा विजय होत असतो. श्रीलंकेचे माजी क्रिडामंत्री महिंदानंदा अथुलगामगे यांनी असा दावा केला आहे की, इ.स. २०११ च्या विश्वकपमधील अंतिम सामना फिक्स होता आणि त्यांच्या देशाने तो भारताला विकला होता. महिंदानंदा यांचा हा दावा अविश्वसनीय आहे. सर्वांनाच हे माहित आहे की, जगातील मोठमोठ्या क्रिकेट चमूंना भारतीय खेळाडूनी धूळ चारलेली आहे. श्रीलंकेला त्यावेळी श्रीलंकेच्या चमूने २७४ धावा काढल्या होत्या तर भारतीय खेळाडूंना विजयासाठी १७५ धावांची आवश्यकता होती. गौतम गंभीरने ९७ धावा काढल्या होत्या तर महेंद्रसिंग धोनीने ९१ धावा काढून श्रीलंकेचा पराभव  केला व विश्वकप भारताच्या नावे केला. उत्कृष्ठ मॅच फिनिशर म्हणून धोनीच्या ख्याती आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. पराभवानंतर विजयी चमूबाबत चुकीचे बोलणे खेळ भावनेला तडा देण्यासारखे आहे. आता ९ वर्षांनंतर त्या मॅचबाबत बोलणे व ती मॅच फिक्स असल्याचा आरोप करणे निश्चितच संयुक्तिक वाटत नाही. असे वक्तव्य करुन श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री त्यांत्या देशाचीच बदनामी करीत आहे. माजी क्रीडामंत्री त्यांच्या देशाचीच बदनामी करीत आहे. मादी क्रीडामंत्री महिंदानंदा त्यांच्या देशाचे तात्कालिन राष्ट्रपती जयवर्धने यांनासुद्धा वादामध्ये ओढले आहे. जयवर्धने हे त्यावेळी हा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. ही मॅच फिक्स करण्यामध्ये खेळाडूच नाही तर काही राजकीय पक्षही सामील आहेत. असेही महिंदानंदा यांनी म्हटले आहे, श्रीलंकेचे आणखी एक माजी क्रीडामंत्री हरिन फर्नांडो यांनीही श्रीलंका क्रिकेटमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार फोफावला असल्याचे म्हटले आहे. एव्हढेच नव्हे तर आयसीसीएनेसुद्धा श्रीलंकेला जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी देश असे म्हटले आहे. या महिन्याच्या प्रारंभी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने म्हटले होते की  आयसीसीएची एक समिती ३ माजी क्रिकेट खेळाडूंची मॅचफिक्सिंगच्या आरोपाची चौकशी करीत आहे. मॅचफिक्सिंगचा रोग सर्वत्र पसरलेला आहे. आफ्रिकेचे कर्णधार हांसी क्रोनिए यांचे नाव सुद्धा मॅचफिक्सिंगंमध्ये आले होते. भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार अझरुद्दीन आणि फलंदाज मनोज प्रभाकर यांचेही क्रिकेट करिअर मॅच फिक्सिंगमुळेच संपुष्टात आलेले आहे. श्रीलंकेचे माजी कर्णधार जयवर्धने यांनी महिंदानंदा यांचे आरोप निराधार आणि चुकीते असल्याचे म्हटले आहे.