मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला पायलट यांची ताठर भूमिका मात्र कायम

गेल्या महिन्याभरापासून राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय ओढाताणीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, परंतु सचिन पायलट यांची बंडखोरीची भूमिका मात्र अजूनही कायम आहे. पायलट जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा ते गहलोत यांच्या बाजूला बसायचे, आता मात्र त्यांना दुसऱ्या रांगेत बसण्याची जागा मिळाली आहे. त्यांच्या जागेजवळून विरोधी पक्ष सदस्यांना सभागृहात बसण्याच्या जागा मिळालेल्या आहेत. यावरून पायलट म्हणाले की, माझी जागा सरहद्दीवर आहे. एकीकडे सत्ता

गेल्या महिन्याभरापासून राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय ओढाताणीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, परंतु सचिन पायलट यांची बंडखोरीची भूमिका मात्र अजूनही कायम आहे. पायलट जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा ते गहलोत यांच्या बाजूला बसायचे, आता मात्र त्यांना दुसऱ्या रांगेत बसण्याची जागा मिळाली आहे. त्यांच्या जागेजवळून विरोधी पक्ष सदस्यांना सभागृहात बसण्याच्या जागा मिळालेल्या आहेत. यावरून पायलट म्हणाले की, माझी जागा सरहद्दीवर आहे. एकीकडे सत्ताधारी आणि दुसऱ्या बाजूला विरोधक मला विरोधकांजवळ यासाठी बसविण्यात आले आहे की, सीमेवर नेहमी शक्तीशाली योद्ध्यांनाच पाठविले जाते. पण, एव्हढे मात्र लक्षात घ्या की, जोपर्यंत मी बसलेलो आहे. तोपर्यंत सरकार पूर्णपणे सुरक्षित आहे. पायलटच्या यांच्या वक्तव्यावरुन असे वाटते की, अजूनपर्यंत त्यांचा ज्वालामुखी शांत झालेला नाही. ते म्हणाले की, वेळ येताच सर्व बाबींचा खुलासा करण्यात येईल. जे काही मला सांगायचे होते ते सर्व मी वरिष्ठांना सांगितले आहे. सभागृहात आल्यानंतर आतापर्यंत जे काही घडले, ते विसरावे लागणार आहे. आता आम्ही सर्व एकत्र आहोत. राज्यातील काँग्रेस सरकारच्या सुरक्षेचे पायलट यांनी आश्वासन दिलेले आहे. परंतु, एकेकाळी मी सरकारचा एक हिस्सा होतो. हे सांगण्यास मात्र ते विसरले नाही. जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी राज्यासाठी समर्पित राहणार आहे. सभागृहात विश्वासदर्शक ठराव बहुमताने पारित झालेला आहे. सभागृहातील पायलट समर्थकांच्या बसण्याच्या जागा बदलण्यात आल्या आहेत. पर्यटनमंत्री पदावरुन काढून टाकल्यानंतर विश्वेंद्रसिंह यांना शेवटच्या रांगेत बसविण्यात आले. त्याचप्रमाणे अन्न व नागरी पुरवठामंत्री पदावरुन हटविण्यात आलेल्या रमेश मीणा यांना सहाव्या रांगेत बसविण्यात आले. पायलट समर्थकांच्या जागा बदलविल्यानंतर असे सांगण्यात आले आहे की, कोरोना महामारीमुळे अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांनी समजविल्यानंतर पायलट यांनी त्यांचे गहलोत सरकारविरुद्धचे बंड मागे घेतले, त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकारवरील संकट टळले. पक्ष पायलटसोबत अन्याय करणार नाही. पुढे चालून पायलट यांच्याकडे पक्षसंघटनेत मोठे पद सोपविले जाईल असे राजकीय गोटात बोलल्या जात आहे.