कोरोनाने केला कहर, सणांचा उत्साह हिरावला

गतवर्षी १ मार्च रोजी होळी साजरी करण्यात आली. त्यानंतर 'कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आले. 'लॉकडाऊनमुळे सर्वच सण नाममात्र साजरे करण्यात आले. सणांच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडले. पूर्वी असे भीषण संकट कधीच आले नव्हते. आपळे सर्व सण प्रेम, स्नेह आणि परस्परांमधीळ आपलेपणा वाढविणारे असतात.

    आपल्या प्रत्येक सणांमध्ये स्वाभाविक भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. परंतु यावेळी पहिल्यांदाच होळीचा सण बेरंग झालेला आहे. रंग- गुलाळ उधळण्याऐवजी तोंडावर मास्क लावूनच रंगोत्साह साजरा करावा लागणार आहे. कोणीही एकमेकांची गळाभेट घेऊ शकणार नाही. होळी आणि रंगोत्सवाच्या मौज-मस्तीवर ग्रहण लागलेले आहे. गतवर्षी रक्षाबंधन, दसरा आणि दिवाळी हे सणसुद्धा कोरोना महामारीमुळे साजरे करता आले नाही. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही कुणाच्या घरी जात नव्हते.

    रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर बहिणी राखी बांधू शकल्या नाहीत. दिवाळीच्या आनंदावरही कोरोनामुळे विरजण पडले. याचप्रमाणे जैन समाजाचे पर्युषण पर्व, ख्रिश्चन समाजाचा ख्रिसमस आणि मुस्लिमांची ईदसुद्धा कोरोनामुळे प्रभावित झाली होती. सर्व समाजाचे सण कॅलेंडरपुरतेच मर्यादित राहिले. धार्मिक सणाप्रमाणे आमचे राष्ट्रीय उत्सवसुद्धा साजरे करता आले नाही. कोरोनाने आपल्या धार्मिक आणि राष्ट्रीय सणांचा आनंदच हिरावून घेतला. अशी परिस्थिती यापूर्वी कधीच निर्माण झाली नव्हती. कोरोना आता आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. त्

    यामुळे जनतेला नेहमीसाठीच कोरोनापासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाची लस टोचून घेण्यासाठी कित्येक जण टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येतात, परंतु ही टाळाटाळ करणे अत्यंत घातक ठरू शकते. कोरोनामुळे सणांमधीळ उत्साह हिरावळा असा पते अशी परिस्थिती नेहमीसाठी राहणार नाही एवढे मात्र खरे!