फास्ट फूडची क्रेज, मॅगी आरोग्याला हानिकारक; तरीही आपण हे चवीनेच खाणार, याचेही आहेत भयंकर परिणाम

नव्या पिढीला फास्ट फूड (fast food) इतके आवडतात की, मुलं घरी तयार केलेला उपमा (upma), चिवडा (chiwda) अथवा आलू-पोहे (aloo-poha) खातच नाही. त्यांना पास्ता(pasta), नूडल्स(nuddles), मॅगी (maggie), पिझ्झा (pizza), सँडविच (sandwich), ब्रेड-पकोडा (bread pakoda) इत्यादी पदार्थ हवे असतात. यासोबतच लिमका(limca), पेप्सी (pepsi) ही थंड पेयेसुद्धा (cold drinks) पाहिजे असतात.

    मुलांना या पदार्थाची सवय झाल्यामुळे त्यांना हे पदार्थ व पेये खाऊ-पिऊ नये असे सांगणेही कठीण झाले आहे. हे सर्व पदार्थ शरीराला पोषक तर नसतातच उलट ते शरीराला बाधक असतात. या सर्व फास्ट फूडमध्ये कॅलरी असतात परंतु शरीराला पोषक असे काहीही नसते. पूर्वी लोकं मुलांना सकाळी दूध-पोळी, पराठा-चटणी किंवा लोणचे असा नाश्ता द्यायचे. परंतु आता मात्र लहान मुलांपासून युवकांची आवड-निवडच बदलून गेली आहे. चविष्ट पदार्थ खाण्याकडे मुलांचा कल वाढलेला आहे. या पदार्थांमध्ये पोषक तत्व नसतात.

    जगप्रसिद्ध कंपनी नेस्लेने सुद्धा मान्य केले आहे की, कंपनी तयार करीत असलेल्या ६० टक्के खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये शरीराला पोषक असे काहीही नसते. या कंपनीची मॅगी आणि नेसकॉफी जगप्रसिद्ध आहे. कंपनीने काही पदार्थांना स्वास्थ्याला पोषक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये कंपनीला यश आले नाही. तथापि कंपनीने त्यांच्या काही खाद्य पदार्थामधील साखर आणि सोडियमची मात्रा कमी केलेली आहे. मागील ७ वर्षामध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण १४ ते १५ टक्के कमी केल्याचा दावाही या कंपनीने केला आहे. ही कंपनी दूध, नूडल्स, चॉकलेट, कॉफी इत्यादींची निर्मिती करते.

    नेस्ले कंपनीच्या अगोदर पेप्सिको आणि मॅकडोनाल्ड या कंपन्यांवर मानवी आरोग्याला हानिकारक पदार्थांची निर्मिती करून ते बाजारात विकत असल्याचा आरोप होता. नेस्लेने आता त्यांच्या मानेसर येथील आर अँन्ड डी सेंटरला स्वास्थ्याला पोषक असे पर्यायी उत्पादन करण्यास सांगितले आहे. आता ही कंपनी पालक आणि गव्हाच्या पीठापासून मॅगी व चॉकलेट तयार करणार आहे. या कंपनीला संतुलित पोषण आहाराकडे लक्ष द्यावे लागणार आहे. साखर आणि मीठाचे जास्त प्रमाण मानवी स्वास्थ्याला हानिकारक असते. ही कंपनी सेरेलॅक, मॅगी नूडल्स, कॅचअप, सूप, पास्ता, मंच, पोलो व नेसकॉफीचे उत्पादन करीत असते.

    The craze for fast food Maggie detrimental to health Even so owning one is still beyond the reach of the average person