रघुवंश यांच्या निधनाने लालूंना मोठा झटका

रघुवंश यांनी नितीशकुमारांना एक पत्र लिहिले होते. आणि त्यात तीन मागण्यात करण्यात आल्या होत्या. त्यात वैशालीच्या विकासाची मागणी होती. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी वैशाली येथे येऊन ध्वजारोहण करावे. तिसरी मागणी भगवान बुद्धाचे अक्षय पात्र जे अफगाणिस्तान येथे आहे. तेथून आणून वैशाली येथे ठेवण्यात यावे.

राजदचे नेते लालूप्रसाद यादव ( Laluprasad Yadav) यांचे मित्र आणि बिहारचे दिग्गज नेते रघुवंशप्रसाद सिंह (Raghuvansh Singh) यांचे आकस्मिक निधन होणे लालूंसाठी मोठा धक्का आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना राजकारणाला प्रभावित करणारी आहे. या लालूंचा एक जवळचा आणि घनिष्ठ सह्योगी गेल्याने याचा गडद परिणाम होणार आहे. तलवारीचा घाव भरुन जातो मात्र अपमानाचा नाही. अपमान व्यक्तीला तोडून ठेवतो. रघुवंशप्रसाद सिंह यांनी राष्ट्रीय जनता दलाला आपल्या परिश्रमाने मोठे केले होते. मात्र, लालूंची मुले तेजस्वी आणि तेजप्रताप त्यांना अपमानित करत होते. रघुवंश यांनी त्यांना लहानपणापासून पाहिले होते. मात्र, मोठे झाल्यावर त्यांच्या वागणुकीमध्ये खूप बदल झाला होता. जेव्हा रघुवंशप्रसाद सिंह यांना ही वागणूक सहन झाली नाही तेव्हा त्यांनी लालूंना लिहिले, बस लालजी बस आता अजून सहन नाही होत. इतक्या वर्षांपासून मी तुमच्यासोबत सावलीसारखा राहिलो याचे हे फळ मिळाले. त्यांनी जड अंतःकरणाने राजीनामा दिला. त्यांचे ज्येष्ठत्व आणि प्रभाव पाहून त्यांना राजदने आपल्याकडे वळविण्याचे खूप प्रयत्नही केले. यामागील एक कारण असेही होते की, रघुवंश यांनी नितीशकुमारांना एक पत्र लिहिले होते. आणि त्यात तीन मागण्यात करण्यात आल्या होत्या. त्यात वैशालीच्या विकासाची मागणी होती. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी वैशाली येथे येऊन ध्वजारोहण करावे. तिसरी मागणी भगवान बुद्धाचे अक्षय पात्र जे अफगाणिस्तान येथे आहे. तेथून आणून वैशाली येथे ठेवण्यात यावे. एनडीएमध्ये सहभागी झालेले पूर्व मुख्यमंत्री व हिंदुस्थान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझीने रघुवंश यांना एनडीएमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. भाजपचे प्रवक्ता निखिल आनंद यांनी म्हटले होते की, रघुवंशप्रसाद सिंह एनडीएमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी असलेल्या रघुवंशप्रसाद सिंह यांच्या प्रकृतीबाबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डाही चिंतित होते. नड्डा यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करताना त्यांच्या उपचारासाठी पक्षाकडून हवी ती मदत देण्याचे सांगितले होते. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. सोडियमची कमतरता आणि रक्तसंचार न होण्याच्या समस्येमुळे त्यांची तब्येत खालावली आणि प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बिहारने कष्टकरी सार्वजनिक नेत्याला गमावले आहे.