सीरम इन्स्टिट्यूटची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज

कोरोनावरील कोविशिल्ड लसनिर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेल्या आगीमागे निश्चितच काहीतरी षडयंत्र असल्याची शंका घेतली जात आहे. अशा महत्त्वाच्या संस्थेच्या इमारतीची कडक सुरक्षा ठेवायला हवी होती, परंतु सुरक्षेमध्ये कुठेतरी ढिलाई झाल्याचे दिसून येते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, या इमारतीच्या ‘सी’ विंगला आग लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच इमारतीमध्ये तयार होणाऱ्या कोविशिल्ड लसीची पाहणी केली होती. या भीषण अग्निकांडामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये पुण्यातील २, उत्तरप्रदेशातील २ आणि बिहारच्या एका कामगाराचा समावेश आहे. ६ कामगारांना वाचविण्यात यश मिळाले आहे. ज्या ठिकाणी आग लागली होती तेथे कोणत्याही मोठ्या मशीन नव्हत्या तेथे केवळ फर्निचर ठेवलेले होते.

वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, वेगवेगळ्या चमू ४ या अग्निकांडाची चौकशी ७ करेल. येथे सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येत होते किंवा नाही, हे चौकशीनंतरच कळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, जेथे कोरोना व्हॅक्‍सीनची निर्मिती करण्यात येत आहे. त्या ठिकाणी आग लागली नव्हती. बीसीजी लसनिर्मिती होत होती त्या इमारतीला आग लागल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, मांजरी येथील नवीन प्लांटच्या इमारतीळा आग लागली आहे. येथे रोटा व्हायरस प्लांटचे काम सुरू होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागल्याचे टोपे यांनी सांगितले. या इमारतीचे फायर ऑडिट करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी सांगितले की, जेथे कोरोना लसीची निर्मिती होत आहे ती जागा पूर्णपणे सुरक्षित आहे. तेथून १ किलोमीटर अंतरावर ही आग लागली आहे. या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर बीसीजी व्हॅक्‍सीनची लॅब असून ती लॅब पूर्णपणे सुरक्षित आहे. कोविशिल्ड लसीच्या उत्पादनावर या आगीचा कोणताही परिणाम होणार नाही. ‘लसनिर्मितीचे काम सुरूच राहील. जेथे महत्त्वाच्या लसींचे उत्पादन सुरू असते ते ठिकाण पूर्णपणे पुरत ठेवण्याची गरज आहे. भारताने कोरोनावर लस निर्माण जगातील कितीतरी देशांमध्ये ईर्ष्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी भारतविरोधी शक्‍ती असे काही षडयंत्र करू शकतात, हे लक्षात घेऊन या इमारतीची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे.