उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य

जेव्हा एखादा पक्ष सत्तेत नसतो, तेव्हा जवळची माणसेही दूर जातात. बुडत्या जहाजातून उंदीरसुध्दा बाहेर निघून जातात. अगदी असचं काहीसं उप्रमधील बसपामध्ये सुरू आहे.

    बसपच्या नेत्या मायावती जेव्हा उत्तरप्रदेशात सत्तेत होत्या, तेव्हा कित्येक बसप नेत्यांनी स्वार्थासाठी मायावतीला सहकार्य केले. परंतु आज मात्र तेच नेते मायावतीपासून दूर गेलेले आहेत. सत्ता गेल्यानंतर मायावती पक्षाला एकसंध ठेवण्यात अपयशी ठरल्या आहेत. उत्तरप्रदेशात भाजपाचे १९ आमदार होते, परंतु आता केवळ ७ आमदार बसपकडे राहिलेले आहेत. विधिमंडळातील पक्षाचे नेते लालजी वर्मा आणि माजी मंत्री राम अचल रात्रभर यांच्यानंतर बसपचे प्रमुख नेते नारायणसिंह उपाख्य जी. एम. सिंह यांनीही मायावतीची साथ सोडली आहे.

    उप्रमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणखी ८ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना बसपमध्ये उभी फूट पडलेली आहे. कोणताही मोठा नेता आता बसपकडे नाही. बहुतांश नेत्यांनी बसपला रामराम ठोकला आहे. इ. स. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत बसपने १९ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतत आंबेडकरनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बसपकडे १७ आमदार शिल्लक राहिले. मागील ४ वर्षांत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षाने ९ आमदारांना निलंबित केले आहे. २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. आता केवळ ७ आमदार बसपकडे उरले आहेत. उत्तरप्रदेशात जातीयवाद राजकारण आहे.

    मायावती आणि भाजपाच्या वाद-विवादामुळे बसपच्या मुस्लिम नेत्यांनी सपाची कास धरली. बहुतांश मुस्लिम नेते बसपला रामराम ठोकून समाजवादी पक्षात गेले. एक वेळ तर अशी होती की, उप्रच्या दलित राजकारणावर मायावतीचे संपूर्ण वर्चस्व होते. मायावतीचे ठिकठिकाणी नोटांचे हार घालून स्वागत करण्यात येत होते. जो उमेदवार जास्त पैसा देईल, त्यालाच विधानसभेची उमेदवारी देत होत्या, असाही आरोप एकेकाळी मायावतींवर करण्यात येत होता. योगी यांच्या नेतृत्वात मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळाले आणि मायावतीच्या पक्षाचा दारुण पराभव झाला असून आता तर बसपची अत्यंत दारुण अवस्था झालेली आहे.

    The plight of the BSP in UP The future will be in the coming elections