power grid failuer

राजकीय पक्षही २४ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देत असतात, परंतु तसे मात्र होत नाही. देशातील २१ राज्यांतील १५२ जिल्ह्यात १५००० घरांचा सर्व्हे केल्यानंतर हे स्पष्ट झाले की, देशातील बहुंतांश जनता वीज कपातीच्या संकटाचा सामना करीत आहेत. कधी भारनियमन तर कधी देखभाल दुरूस्तीच्या नाकावर वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो.

स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली, परंतु, अजूनही देशातील कित्येक गावांत वीज (power ) पोहोचलेली नाही. कॉन्सिल ऑफ एनर्जी एनव्हायरमेंट अँण्ड वॉटर (Council of Energy Environment and Water) या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. देशातील दोन तृतीयांश गावांमध्ये आणि ४० टक्के शहरी विभागात दिवसातून एकदा तरी वीजपुरवठा (power supply) खंडित होत असतो, विद्युत ट्रान्सफॉरमरमध्ये होणारे बिघाड, वीजचोरी यामुळे देशातील अनेक गावांमध्ये २४ तास वीजपुरवठा होऊ शकत नाही. देशातील एक तृतीयांश जनता अजूनही वीजपुरवठ्याच्या संकटाचा सामना करीत आहेत. होल्टेज, कमी-जास्त होत असल्यामुले टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर-ग्रायंडर खराब होतात. त्यामुळे ग्राहकांना नुकसान भोगावे लागते.

विद्यतु ग्राहक त्यांच्या अधिकारांबाबत अजूनही जाग़ृत नाही. त्यामुळे केवळ ६ टक्के ग्राहकच संबंधित विभागाकडे यासंबंधी तक्रार करीत असते. जगातील सर्वाधिक वीजनिर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजकीय पक्षही २४ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देत असतात. परंतु तसे मात्र होत नाही. देशातील २१ राज्यांतील १५२ जिल्ह्यात १५००० घरांचा सर्व्हे केल्यानंतर हे स्पष्ट झाले की, देशातील बहुंतांश जनता वीज कपातीच्या संकटाचा सामना करीत आहेत. कधी भारनियमन तर कधी देखभाल दुरूस्तीच्या नाकावर वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो.

देशातील ७६ टक्के लोकांच्या निवासस्थानाचा वीजपुरवठा तर अनेकदा खंडीत होत असतो. ज्या राज्यांमध्ये कित्येक तासांपर्यंत वीजपुरवठा खंडीत होत असतो. त्यामध्ये पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा लागतो. त्यानंतर झारखंड, आसाम, बिहार आमि हरियाणाचा क्रमांक येतो. दुसरीकडे वीजचोरी करणाऱ्यांचीही काही कमी नाही. अनेक वस्त्यांमधील लोक विजेच्या तारांना हूक लावून वीजचोरी करतात. काहीजण तर विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करतात. यामुळे विद्युत विभागाचे मोठे नुकसान होत असते. तसेच या नुकसानीचा भुर्दंड प्रामाणिक वीज ग्राहकांना भरावा लागतो.