जनता लॉकडाऊन संपण्याच्या प्रतिक्षेत

  • लॉकडाऊनमुळे जनतेच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. घरी बसून आता लोक कंटाळले आहेत. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्याला सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे लागत आहे.

लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त झाली असून हा लॉकडाऊन ताबडतोब संपावा या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मॉल सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. आता मॉल सकाळी ९ वाजेपासून रात्री ७ वाजेपर्यंत सुरु राहतील. परंतु मॉलमध्ये असलेले सिनेमागृह मात्र बंद राहणार आहे. राज्यातील रेस्टॉरंट, शाळा आणि महाविद्यालये ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहे. मैदानी खेळांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली असून या खेळांमध्ये टेनिस, बॅडमिंटन, गोल्फ मल्लखांब आणि व्यायाम शाळांचा समावेश आहे. टॅक्सी आणि खासगी कारमध्ये ड्रायव्हरसह ३ जणांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुचाकी वाहनांवर चालकासह एका व्यक्तीला बसण्याची मुभा देण्यात आली आहे. ऑटोरिक्षामध्ये चालकासह २ जणांना परवानगी आहे. सर्वांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मेट्रो, रेल्वे स्विमिंग पूल सभागृह आणि पार्क सुरु करण्यास मात्र परवानगी नाही. लॉकडाऊनमुळे जनतेच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. घरी बसून आता लोक कंटाळले आहेत. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्याला सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे लागत आहे. नेहमी घराबाहेर राहणारे लोक स्वतःच्या घरातत कैद झालेले आहेत. यामुळे देशातील ४५ टक्के लोकांमध्ये डिप्रेशन आलेले आहे. स्वास्थ विषयक पाहणी मंचने १० हजार भारतीयांचा सर्व्हे केल्यानंतर हा निष्कर्ष काढलेला आहे. लोकांमध्ये निराशेची भावन वाढू लागली आहे. देशातील लोक त्यांचा व्यवसाय, नोकरी आणि वेतनबाबत चिंतित आहेत. बेकारांची संख्या वाढू लागली असून युवक तणावग्रस्त होताना दिसत आहेत. लहान मुलांना सुद्धा खेळण्यासाठी बाहेर जाण्यास मनाई असल्यामुळे ते सुद्धा आपल्या शाळकरी सवंगड्यांना मिस करीत आहेत. लहान मुल घरी जरी कोणतीही तक्रार करीत नसले तरी तेही तणावग्रस्त आहेत. घरातच बंदिस्त राहावे लागत असल्यामुळे लोकांचा स्वभाव चिडखोर झालेला आहे. सार्वजनिक कार्यक्रम बंद झालेले आहेत. एखादा बाहेरचा व्यक्ती किंवा एखादा पाहूणा आला तरी तो कोरोनग्रस्त असणार नाही ना, अशी शंका घेतल्या जाते. ही परिस्थिती केव्हा संपेल, याची कोणालाही माहिती नाही. सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे.