The second wave of corona in the country

कोरोनाची दुसरी लाट (The second wave of corona virus ) आता हिवाळ्यात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत प्राप्त झालेले आहेत. दिल्लीमध्ये (Delhi Corona) रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. अहमदाबाद शहरात संचारबंदी लागू करावी लागली. महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून शाळा (School) सुरू होणार होत्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता सरकारी आणि खासगी शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाचे संकट आता संपलेले आहे आणि कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे,   असे समजणे म्हणजे स्वत:लाच धोका देण्यासारखे ठरेल. वस्तुस्थिती तर अशी आहे की, ही महामारी पुन्हा जोरात येत असून या रोगाचे संक्रमण कमी होण्याऐवजी ते आणखीच वाढत (The second wave of corona in the country) आहेत. यामुळे देशातील राज्य सरकार चिंताग्रस्त झालेले आहे. परिस्थितीत सुधारणा होऊन ही महामारी नियंत्रणात येण्याच्या सर्व अपेक्षा फोल ठरल्या असून कित्येक राज्यांमध्ये ‘लॉकडाऊन’ करण्यायोग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे तेथे कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. देशात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर असे वाटत होते की, आता कोरोनाचे संकट संपले आहे. दिवाळीच्या सणासाठी लोकांनी बाजारात कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता खरेदी केली. आता हाच बेजबाबदारपणा लोकांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

विशेषता वृद्धांना कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता आहे. हृदयरोग आणि मधुमेहाच्या रोग्यांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हे लोक लवकरच संक्रमित होत असते. कोरोनाची दुसरी लाट आता हिवाळ्यात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत प्राप्त झालेले आहेत. दिल्लीमध्ये रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. अहमदाबाद शहरात संचारबंदी लागू करावी लागली. महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता सरकारी आणि खासगी शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या शाळांचे अनेक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत.

दिल्ली-मुंबई विमान वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. दिल्लीवरून कोणीही कोरोना संक्रमित रुग्ण मुंबईत येऊ नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. मध्यप्रदेशातील ५ शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता तेथे ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. गुजरात आणि झारखंड सरकारनेही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.