पतंजलीच्या ‘कोरोनिल’वर रामदेव, बाळकृष्ण यांची वेगवेगळी मते

पतंजली आयुर्वेदने कोरोनावर कोरोनिल हे औषध काढले गतवर्षीच्या जून महिन्यात पतंजलीने जे कोरोना किट सादर ते किट संपूर्ण देशात वादग्रस्त ठरले होते. अँलोपॅथीच्या समर्थकांचे म्हणणे होते की, कोरोना महामारी व्हायरसमुळे संपूर्ण जगात पसरलेली आहे. ही महामारी थांबविण्यासाठी त्यावर व्हॅक्‍सीन असणे आवश्यक आहे.

    या बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या नियंत्रणासाठी अँलोपॅथी औषधीच परिणामकारक ठरू शकते. आयुर्वेद केवळ त्रिदोष, वात, पित्त, कफ संतुलन आणि नाडी परीक्षेपुरतेच सीमित आहे. आयुर्वेद औषधीमुळे रोग्यांची प्रतिकारशक्‍ती वाढू शकेल, परंतु साथरोग किंवा महामारीवर आयुर्वेद औषधी कशी काय उपयुक्त ठरू शकेल? मागील शुक्रवारी रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा कोरोनावरील औषधी कोरोनिल सादर केले. यावेळी केंद्रीय स्वास्थ्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यावेळी रामदेवबाबांनी पतंजलीच्या कोरोनिल या औषधीला जागतिक स्वास्थ्य संघटनेने ( डब्ल्युएचओ) प्रमाणित केलेले आहे, असे सांगितले.

    यावर डब्ल्यूएचओने स्पष्ट केले की, कोरोनावरीळ उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधांचे पुनरावलोकन केले नसून तसे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. इकडे मात्र पतंजली आयुर्वेदचे प्रबंध संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले की, डब्ल्यूरचओ कोणतेही औषध मंजूर किंवा नामंजूर करीत नाही. कोरोनिल या औषधीला ड्ग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) फार्मास्युटिकल प्रॉडक्ट सर्टिफिकेट म्हणजे सीपीसी प्रमाणपत्र दिलेले आहे.

    पतंजली लोकांमध्ये यानुषंगाने पसरलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोनिळ हे औषध डब्ल्यूएचओकडून प्रमाणित नसल्याचे बाळकृष्ण यांनी स्पष्ट केले आहे. यावरून रामदेवबाबा यांनी कोरोनिळला आयुष मंत्रालयाच्या योजनेंतर्गत डब्ल्यूरचओकडून प्रमाणपत्र मिळालेले आहे असा जो दाबा केला होता तो चुकीचा होता, हे स्पष्ट झाले आहे. कोरोनिल ही औषधी शरीराची रोगप्रतिकार शक्‍ती वाढविण्यासाठी उपयुक्‍त आहे, असे म्हणून ती औषधी पतंजली आयुर्वेद विकू शकते, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.