Trinamool brings BJP's 'Nakinau' central government to prepare for presidential rule in Bengal

भाजपाने ४ जागावरून ४८ जागापर्यंत मजल मारली आहे, त्यामुळे भाजापामध्ये उत्साह संचारलेला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणा-या बंगाल विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याची भाजपा तयारी करीत आहे.

बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (Trinamool ) आणि भाजपामध्ये (BJP) थेट संघर्षांची स्थिती आहे आणि या दोन्ही पक्षामधील संघर्ष आणखी उग्र रूप धारण करीत आहे. उभय पक्षामध्ये हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांचे एकमेकांसोबत पटत नाही. दोघांमध्ये नेहमीच वाद-विवाद होत असताज. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा जेव्हा बंगालच्या दौ-यावर गेले होते, तेव्हा नड्डा यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवून गाड्यांची तोडफोड केली होती. त्यावेळी नड्डा म्हणाले होते की, आपण बुलेटप्रूफ गाडीत असल्यामुळे सुरक्षित राहिलो. एकूणच बंगालची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना राज्यघटनेचे पालन करण्याचा इशारा दिला आहे. जर त्यांचे सरकार घटनेतील तत्त्वांचे पाळन करणार नाही तर मग आपल्याला कठोर पावलं उचलावी लागेल, असेही राज्यपाल धनखड यांनी म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असल्याचा अहवाल केंद्राकडे पाठवून घटनेच्या ३५६ व्या कलमानुसार राज्यातील ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस राज्यपाल करू शकतात. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तशाही भाजपाच्या दबावाखाली येणारच नाही. गेल्या वर्षभरापासून भाजपा बंगालमध्ये आपला राजकीय प्रभाव वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे, त्यामुळेच तृणमूल आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हिंसक चकमकी होत आहे.

भाजपा कार्यकर्ते आणि बंगाल पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एक भाजपा कार्यकर्ता ठार झाला असून या घटनेवरून भाजपाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. बंगालमध्ये तीन दशकांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षाच्या सरकारला ममताने त्यांच्याच पद्धतीने लढा देऊन हटविले. आता मात्र ममताचा थेट मुकाबला भाजपासोबत आहे. बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांना भाजपाच्या केंद्रीय नेत्यांचा पूर्ण पाठिंबा आणि समर्थन आहे. जर भाजपा हैदराबाद महापालिका निवडणुकीत ४ जागावरून ४८ जागापर्यंत मजल मारू शकतो तर बंगाल विधानसभा निवडणुकीत का जिंकू शकणार नाही ? अगदी याच फार्म्युल्यावर आता भाजपा बंगालमध्ये कार्य करीत आहे. ममता बॅनर्जी यांनासुद्धा डावे आणि काँग्रेसपेक्षा भाजपा मोठा प्रतिस्पर्धी आहे, असे वाटते. ममता बॅनर्जी यांचे राजकारण नेहमीच मुस्कीम मतांवर आधारित राहिलेले आहे. बांगला देशातील घुसखोरांबाबतही ममताची भूमिका नेहमीच मवाळ राहिलेली आहे.