trp

चौकशीदरम्यान काही घरांमध्ये टीआरपी मीटरही लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित वाहिनी आणि एजन्सीच्या माध्यमातून काहींना दररोज ५०० रुपये देण्यात येतात व एकच वाहिनी दिवसभर सुरु ठेवण्यास सांगण्यात येते. तपासात काही अशीही घरे आढळली आहेत की, जी बंद आहेत परंतु तेथे दिवसभर टीव्ही मात्र सुरुच असतो.

टीआरपीला  (TRP ) वाढवून दाखवायचे व आपण खूपच लोकप्रिय (popularity of TV channels) आहोत, असा दावा करणाऱ्या दूरदर्शन मालिकांचा घोटाळा (scam) उघड झाला आहे. मुंबईमध्ये या बोगस टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे. आपल्या मालिकांची लोकप्रियता दाखविण्यासाठी दूरदर्शनवरील काही वाहिन्या स्वतःला क्रमांक १ वर असल्याचे दाखवित आहे. मुंबई पोलिसांनी या वाहिन्यांचे पितळ उघड केले आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले की, या प्रकरणी २ वाहिन्यांच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रिपब्लिक दूरदर्शनचे नाव पुढे आले असून या वाहिनीचे संचालक आणि प्रमोटर विरुद्ध चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान काही घरांमध्ये टीआरपी मीटरही लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित वाहिनी आणि एजन्सीच्या माध्यमातून काहींना दररोज ५०० रुपये देण्यात येतात व एकच वाहिनी दिवसभर सुरु ठेवण्यास सांगण्यात येते. तपासात काही अशीही घरे आढळली आहेत की, जी बंद आहेत परंतु तेथे दिवसभर टीव्ही मात्र सुरुच असतो. अशाप्रकारे बोगस टीआरपी वसूल करण्यात येतो. टीआरपीचा असा अर्थ आहे की, एका विशिष्ट वेळेवर किती लोक सामाजिक आणि आर्थिक श्रेणीमध्ये हे चॅनल पाहतात. हा कालावधी १ तास, १ दिवस किंवा १ आठवडाही असू शकतो. दर आठवड्याला हा डेटा सार्वजनिक करण्यात येतो. टीआरपी चांगल्याप्रकारे आली तर ते चॅनल किंबहुना संबंधित कार्यक्रम लोकप्रिय होऊ शकतो. हा घोटाळा ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क) च्या उपकरणाद्वारे करण्यात आला. बार्कने ४५ हजारांपेक्षाही जास्त घरांमध्ये बार-ओ-मीटर लावलेले आहेत. या घरांना १२ श्रेणीमध्ये विभागण्यात आले आहे. कोणता कार्यक्रम किती वेळ बघितला हे कुटुंबातील सदस्यांना जेव्हा आई डी बटण दाबतात तेव्हा कळते. जर ब्रॉडकास्टर ते चॅनल पाहणाऱ्या लोकांना लाच देतात. टीआरपीचा अर्थ असा नाही की, सर्व देशातच टीव्हीवरील हे चॅनल पाहिले जात आहे.