raj - uddhav

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नितीन राऊत यांच्या आश्‍वासनाकडे लक्ष दिले नाही. संपूर्ण राज्यात ग्राहकांना वाढीव बीजबिल आल्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे. मनसेनेही हा मुद्दा लावून धरला. जनतेने वाढीव 'बीजबिलाची रक्‍कम जमा करू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एखाद्या मुद्दयावरून समोरा समोर ( face-to-face ) येतील, याचा कोणी विचारही केला नसेल. राज ठाकरे हे तापट स्वभावाचे आहेत. त्यांनी एखादा प्रश्‍न हाती घेतला तर त्यांचे कार्यकर्ते पूर्ण शक्तिनिशी तो मुद्दा लावून धरतात आणि हा प्रश्‍न जर जनतेशी संबंधित असला तर त्यांना जनसमर्थन स्वाभाविकच आहे. आतापर्यंत फक्त भाजपानेच वीज दरवाढीला (Electricity Bill) विरोध केला होता, परंतु आता मात्र मनसे कार्यकर्ते या दरवाढीच्या विरुद्ध आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. वीज दरवाढीचा मुद्दा (power tariff issue) तापत असताना सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोनाच्या कालखंडात जेव्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, तेव्हा लोकांना नेहमीपेक्षा तिप्पट- चौपट वीजबिल आले होते.

वाढीव वीजबिल माफ करण्याचे आश्‍वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु बिलाच्या रकमेत कोणतीही सूट मिळाली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नितीन राऊत यांच्या आश्‍वासनाकडे लक्ष दिले नाही. संपूर्ण राज्यात ग्राहकांना वाढीव वीजबिल आल्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे. मनसेनेही हा मुद्दा लावून धरला. जनतेने वाढीव वीजबिलाची रक्‍कम जमा करू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. जर कोणी वीज कर्मचारी कनेक्शन कापण्यासाठी आलाच तर मनसे कार्यकर्त्यांना फोन करून त्याची सूचना द्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, या सरकारला नम्रतेची भाषा कळत नाही. हे सरकार जनतेची लूट करीत आहे. वीजबिलाच्या स्वरूपात सरकारने जनतेवर मोठा करच लादलेला आहे.

सरकारच्या या बेताल धोरणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी वाढीव वीजबिलांविरोधी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे तीव्र आंदोलन केले आहे. शिर्डी येथे मनसेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कार्यकर्त्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयात घुसून कार्यालयाची तोडफोड केली. पूर्वी ज्याप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते करीत होते अगदी त्याचप्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांनीही कार्यालयाचे प्रचंड नुकसान केले. राज ठाकरेंची भाषा आणि आंदोलनाची पद्धत त्यांचे काका बाळासाहेब ‘ठाकरे यांच्याप्रमाणेच आहे. काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी स्थानिक लोकांना रोजगार देण्यात यावे या मागणीवरून परप्रांतीयांच्या विरुद्ध जे हिंसक आंदोलन केले होते, ते आंदोलन अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. मनसेच्या आंदोलनामुळे जनतेला न्याय मिळत असेल तर ते त्या आंदोलनाचे मोठे यशच समजायला हवे.