बेरोजगारीने नष्ट होणार पिढी, ४ महिन्यानंतर बोलले डॉ. मनमोहनसिंग

  • समाजाच्या कमकुवत वर्गात मोठ्या प्रमाणावर गरिबीचे पुनरागमन होऊ शकते. अनेक उद्योगही बंद होऊ शकतात. बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ होईल, परिणामी एक पिढीच नष्ट होईल. संपूर्ण जगासाठी ही अत्यंत कठीण वेळ आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोनसिंग हे सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकविला आहे. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असताना त्यांनी खुले आर्थिक धोरण सुरु केले. अमेरिकेत जेव्हा इ.स. २००८ मध्ये अर्थव्यवस्थेत मंदी आली होती, तेव्हा बँका धडाधड बंद पडत होत्या. तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी मनमोहनसिंगांचा स्ला घेतला होता. आर्थिक संकटावर मात कशी करायची याबाबतीत मनमोहनसिंगांना विचारणा केली होती. हेच डॉ. मनमोहनसिंग मात्र मागील ४ महिन्यापासून आगदी शांत बसलेले आहेत. या कालावधीत कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम पडलेला आहे, कित्येक उद्योग-कारखाने बंद झाले आहेत. कर्मचारी कपात करण्यात आली. उद्योग बंद पडल्यामुळे या उद्योगात काम करणाऱ्या उत्तरप्रदेश आणि बिहारच्या कामगारांना त्यांच्या गावी परत जावे लागले. इतके सारे होत असतानाही मनमोहनसिंगांनी मात्र मौन धारण केलेले आहे. अशा बिकट परिस्थितीत मनमोहनसिंगांनी सरकारला कोणताही आर्थिक प्रस्ताव दिला नाही की, सरकार सोबत चर्चाही केली नाही. ते इतके उदासीन का झाले आहेत. हे कळायला मार्गच नाही, ते कदाचित एखाद्या गंभीर विषयावर चिंतन करित असावेत. आता मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवरही झाल्याचे म्हटले आहे. अनेक देशांमध्ये प्रथमच भारतीय अर्थव्यवस्था आकुंचन पावली आहे. याचा अर्थ असा की गेल्या कित्येक वर्षात आपण केलेल्या प्रगतीची दिशा उलट फिरेल. समाजाच्या कमकुवत वर्गात मोठ्या प्रमाणावर गरिबीचे पुनरागमन होऊ शकते. अनेक उद्योगही बंद होऊ शकतात. बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ होईल, परिणामी एक पिढीच नष्ट होईल. संपूर्ण जगासाठी ही अत्यंत कठीण वेळ आहे. संकुचित अर्थव्यवस्थेमुळे आर्थिक संसाधनात कमतरता येईल, त्यामुळे आपल्या मुलांचे पोट भरण्याच्या आणि त्यांना शिकविण्याच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आर्थिक संकटाचा प्रभाव दीर्घकाळपर्यंत राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. विशेषतः गरीब लोक यामुळे जास्त प्रभावित होईल. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सर्वांनाच संपूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज आहे. लॉकडाऊनमुळे लोक भयभीत झाले आहे. लोकांना आपल्या जीवनाविषयी आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे.