उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचा राजीनामा

भाजपा पक्षश्रेष्ठींनी अखेर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचा राजीनामा घेतला. भ्रष्टाचार व प्रशासकीय अकुशलतेचा आरोप रावत यांच्याबर होता. 4 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना बंगारू लक्ष्मण यांना नोटांचे बंड स्वीकारताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते, हे देशातीळ नागरिकांनी दूरदर्शनवर पाहिलेले आहे. यामुळे भाजपाची प्रतिमा प्रचंड डागाळली होती. शेवटी बंगारू लक्ष्मण यांना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

  भाजपा पक्षश्रेष्ठींनी अखेर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचा राजीनामा घेतला. भ्रष्टाचार व प्रशासकीय अकुशलतेचा आरोप रावत यांच्याबर होता. 4 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

  निवडणुकींमध्ये निष्कलंक आणि कर्मठ प्रतिमा घेऊन जायचे असल्यामुळे पक्षनेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप लपविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. चारित्र्य आणि कर्तव्यनिष्ठ नेत्यांचा पक्ष म्हणून भाजपा स्वतःची पाठ स्वतःच थोपटत असते, परंतु भाजपाच्या कितीतरी भ्रष्ट नेत्यांनी सत्ता उपभोगलेली आहे.

  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना बंगारू लक्ष्मण यांना नोटांचे बंड स्वीकारताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते, हे देशातीळ नागरिकांनी दूरदर्शनवर पाहिलेले आहे. यामुळे भाजपाची प्रतिमा प्रचंड डागाळली होती. शेवटी बंगारू लक्ष्मण यांना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

  कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्यावरही बेल्लारी व कोळसा घोटाळ्यातील आरोपी रेडी बंधूसोबत साटेलोटे असल्याचे गंभीर आरोप असतानाही ते अजूनही राज्याचे मुख्यमंत्री आहेत. भाजपाला तेथे कोणताही पर्याय नसल्यामुळे ते मुख्यमंत्रिपपावर कायम आहेत. त्रिवेंद्रसिंह रावत यांच्यावर असा आरोप ठेवण्यात आला आहे की, ते जेव्हा इ.स. 2016 मध्ये भाजपाचे झारखंड प्रभारी होते. तेव्हा त्यांनी एका व्यक्‍तीला गोसेवा आयोगाचे अध्यक्ष बनविण्यासाठी त्यांच्याकडून लाच घेतली आणि ही लाचेची रक्‍कम आपल्या नातेवाईकांच्या बँक खात्यात वळती केली.

  सीबीआयने या संदर्भात दाखल केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिला होता. न्यायमूर्ती रवींद्र मैठाणी यांनी त्यांच्या निर्णयात नमूद केले आहे की, मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याविरुद्ध गंभीर आरोप आहेत. रावत यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

  रावत हे अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. ते काही ठरावीक नोकरशहांच्या माध्यमातूनच सरकार चालवित आहे. रावत यांची मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी राज्यात जोर धरू लागली असतानाच पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घेतला आहे. आता भाजपा रावत यांच्या जागेवर कोणाची मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागते, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.