अमेरिकेत हिंसाचार, महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

अमेरिकेत जॉर्ज फ्लाईड नामक कृष्णवर्णीयाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून आंदोलकांनी लूटमार आणि जाळपोळ सुरु केली आहे. हे

 अमेरिकेत जॉर्ज फ्लाईड नामक कृष्णवर्णीयाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून आंदोलकांनी लूटमार आणि जाळपोळ सुरु केली आहे. हे कृष्णवर्णीय आंदोलनकारी त्यांचे दिवंगत नेते मार्टिन लूथर किंग यांच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गावरुन भरकटले आहेत. मार्टिन लूथर किंग यांनी अनेर यातना सहन करुन सरकारला झुकविले होते. किंग मार्टिन लूथर यांच्या आंदोलनामुळेच कृष्णवर्णीयांना नागरी हक्क मिळाले आहेत. अमेरिकेतील मार्टिन लूथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेते नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधी याच्यापासूनच अहिंसा आणि सत्याग्रहाची प्रेरणा घेतली होती. अतिशय खेदाची बाब आहे की, वाशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतवासासमोर असलेल्या विश्व वंदनीय महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केली आणि काही असामाजिक तत्वांनी हा पुतळा विद्रुप केला. या आंदोलकांनी अमेरिकेचे राष्ट्रपुरुष अब्राहम लिंकन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बनविण्यात आलेल्या मेमोरियलचेही नुकसान केले. यावरुन हे स्पष्ट होते की, अमेरिकेत सध्या अराजकसद्रृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकन पोलिस, सैनिक आणि सुरक्षा एजंसी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तथापि ४० राज्यांमध्ये हिंसाचार पसरलेला आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात अमेरिकेसमोर हे दुसरे संकट उभे ठाकले आहे. येथील सामाजिक ढाचा लक्षात घेतला तर हायस्कूलपर्यंत नि:शुल्क शिक्षण असतानाही अनेक अमेरिकन विद्यार्थी शिक्षणच घेत नाहीत. कृष्णवर्णीय विद्यार्थी शाळेतच जात नाही. अशिक्षित असतानाही त्यांना कुठले ना कुठले काम मिळतेच. अकुशल मजुरांनाही तेथे प्रति तास ९ डॉलर याप्रमाणे पैसे मिळतात. या कृष्णवर्णीयांनी अनेक दुकाने लुटली. संपूर्ण अमेरिकेत अशांतता परसली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी केवळ एक वर्षाचा कालावधी उरला असताना अमेरिकेत असलेली ही शांतता ट्रम्प यांच्यापुढे नवे प्रश्न निर्माण करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे जवळजवळ १ लाख लोकांचा मृत्यू झालेला आहे. अशातच पुन्हा हा कृष्णवर्णीयांचा उपद्रव. अमेरिकेत बंदुकीची संस्कृती आहे. आणि म्हणूनच या हिंसाचाराला नियंत्रणात आणले नाही तर तेथे भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या हिंसाचारामागे कम्युनिस्टांचा हात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.