हेरगिरीच्या आरोपावरून राज्यपाल धनखड आणि मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यामध्ये वाकयुद्ध

राजभवनाची हेरगिरी करण्यात येत असून या प्रकरणी चौकशी केल्यानंतर सत्य काय ते पुढे येईलच. बंगाल सरकार विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदारांवर खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोपही राज्यपालांनी केला आहे. कोणत्याही प्रकारे राजभवनाचे महत्त्व अबाधित राखले जाईल असेही राज्यपाल धनखड म्हणाले.

कोलकाता येथील राजभवनाची हेरगिरी करण्यात येत आहे. असा आरोप बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केला असून या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजभवनावर जो पहारा ठेवण्यात येत आहे. तो आपण सहन करणार नाही. जे कोणी हे कृत्य करीत आहेत. त्यांना शिक्षा व्हायला पाहिज, असे धनखड म्हणाले. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे. एवढेच नव्हे तर हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. राज्यपाल धनखड यांना जाधवपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी जायचे होते. तेव्हा बॅनर्जी सरकारने त्यांना हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले नव्हते. त्यामुळे त्यांना रस्तामार्गे कारने जावे लागले होते.

राज्यातील ममता बॅनर्जी सरकारच्या अनेक निर्णयावर धनखड यांना नाराजी व्यक्त केलेली आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राज्यपाल धनखड हे आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला आहे. राजभवनाची हेरगिरी करण्यात येत असून या प्रकरणी चौकशी केल्यानंतर सत्य काय ते पुढे येईलच. बंगाल सरकार विरोधी पक्षाच्या आमदार आणि खासदारांवर खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोपही राज्यपालांनी केला आहे. कोणत्याही प्रकारे राजभवनाचे महत्त्व अबाधित राखले जाईल असेही राज्यपाल धनखड म्हणाले. माझ्या अनुमतीशिवाय राजभवनातील कोणताही दस्तावेज बाहेर जाता कामा नये. परंतु १४ ऑगस्ट रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एक महत्त्वाचा दस्तावेज बाहेर नेण्यात आला. परंतु,एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो दस्तावेज राजभवनाकडे परत पाठविला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांसारखी वागणूक ठेवायला नको. कर्मचाऱ्यांनी तटस्थ असायला पाहिजे. भाजपचे प्रवक्ते दीलिप घोष  यांनी म्हटले की, राज्याचे पोलिस तृणमूल कॉंग्रेसचे हेर असल्याचप्रमाणेच वागत आहेत. तृणमूल  कॉंग्रेसला आमच्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचा कोणताही अधिकारा नाही. राज्यपालांनी हेरगिरी करण्याचा जो आरोपी केलेला आहे. त्याला उत्तर देताना तृणमूल कॉग्रेसचे खासदार सौगत राय  म्हणाले की, राज्यपालांचा आरोप खोटा आणि निराधार आहे. राज्यपालांनी या प्रकरणी पुरावे सादर करावे, असेही ते म्हणाले. राजभवनात येणाऱ्या पाहुण्यांची नावे गुप्त ठेवण्यात येत नाही. सर्वच कर्मचाऱ्यांना त्या अतिथींची नावे माहीत असतात.